पंधरा दिवसातल्या घडामोडी नीट समजून घ्या; राऊतांनी संभाजीराजेंच्या समर्थकांचे आरोप फेटाळले

शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय पवार यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे.
Sanjay Raut News, Sambhaji Raje News, Latest Political News in Marathi
Sanjay Raut News, Sambhaji Raje News, Latest Political News in Marathisarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना राज्यसभेसाठी शिवसेना पाठिंबा देणार नाही. त्यानरुन मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. संघटनांनी शिवसेनेसह (ShivSena) खासदार संजय राऊत यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. त्यावर राऊतांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. (Sanjay Raut Latest Marathi News)

शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांची उमेदवारी निश्चित केली आहे. बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी याचा पुनर्रच्चार करत संभाजीराजे यांचा विषय आता आपल्यासाठी संपला असल्याचे सांगितले.

Sanjay Raut News, Sambhaji Raje News, Latest Political News in Marathi
संजय पवारांना कोल्हापूरचेच महाडिक देणार टक्कर? राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपची खेळी

राऊत म्हणाले, संजय राऊत यांचा काही व्यक्तिगत संबंध नाही. शिवसेनेचाही संबध नाही. जे अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत त्यांनी गेल्या पंधरा दिवसातल्या घडामोडी नीट समजून घेतल्या पाहिजेत. शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा आम्ही छत्रपतींना द्यायला तयार झालो तो त्यांचा, त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी. यापेक्षा शिवसेनेने काय करायला हवं होतं. निवडून येण्यासाठी 42 मतांचा कोटा लागतो. ही 42 मतं देण्यासाठी तयार होतो. आमची भूमिका इतकीच होती की, ही जागा शिवसेनेची आहे, आपण शिवसेनेचे उमेदवार व्हावे.

छत्रपती आणि त्यांच्या कुटुंबीयांना राजकीय पक्षाचं वावड असण्याचं कारण नाही. यापूर्वी स्वत: सिनिअर शाहू महाराजांनी शिवसेनेत प्रवेश केला. मालोजीराजे हे राष्ट्रवादीचे आमदार होते. स्वत: स्वत: संभाजीराजे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढले आहेत. त्यामुळे छत्रपतींच्या घराण्यातील कुणी राजकीय पक्षात जात नाही, हा त्यांच्या समर्थकांचा दावा चुकीचा आहे. देशभरातील अनेक प्रमुख घराणी कुठल्या ना कुठल्या पक्षात काम करून सामाजिक काम करू शकतात, असं राऊत यांनी सांगितले.

छावा संघटनेकडून इशारा

छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) म्हणाले, शिवसेना छत्रपतींसोबत जो अटी शर्थींचा खेळ खेळत आहे. हा महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही. तसेच शिवसेनेव्यक्तिरिक्त बाकी पक्ष जी बघ्याची भूमिका घेत आहेत ते ही महाराष्ट्राला व आम्हाला आवडलेले नाही. त्यामुळे शिवसेनेने तात्काळ पाठिंबा जाहीर करावा, नाहीतर मतांची बेरीज कशी गोळा करायची हे आम्हाला चांगलेच जमते, असेही ते म्हणाले.

Sanjay Raut News, Sambhaji Raje News, Latest Political News in Marathi
'संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्यास ठाकरे, अजितदादा आणि थोरातांच्या घरात घुसणार'

राज्यसभेच्या ६ व्या जागेच्या बाबतीत राऊतांनी यांनी नाक खुपसू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब सकारात्मक आहेत, असेही जाधव यांनी सांगितले. त्यामुळे संजय राऊत तुम्हाला किंमत चुकवावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com