पालघरमधील चार पंचायत समित्यांवर शिवसेना-राष्ट्रवादीची बाजी; भाजप-शिंदे गटाला प्रत्येकी एक समिती

डहाणू पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीत दोन्ही बाजूला समान मते मिळाली होती. अखेर ईश्वरी चिठ्ठी टाकून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे
Shivsena-ncp
Shivsena-ncpSarkarnama
Published on
Updated on

पालघर : पालघर (Palghar) जिल्ह्यातील पंचायत समितीचे (Panchayat Samati Election) सभापती आणि उपसभापतींच्या निवडणुकीत शिवसेना (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) प्राबल्य राखले आहे. जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांपैकी चार पंचायत समित्या या दोन्ही पक्षाने ताब्यात घेतल्या आहेत. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने प्रत्येकी एक पंचायत समिती मिळविली आहे. (Shiv Sena-NCP win four panchayat committees in Palghar)

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्रमगड, वाडा या चार पंचायत समित्यांवर विजय मिळविला आहे आहे. भारतीय जनता पक्षाने जव्हार पंचायत समितीवर एकहाती सत्ता राखली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तलासरी पंचायत समितीवर वर्चस्व राखले आहे. वसई पंचायत समितीवर बहुजन विकास आघाडीने ताबा मिळविला आहे.

Shivsena-ncp
Jitendra Awhad Arrest : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक : आव्हाडांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्ते झोपले

महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष-शिंदे गटाच्या युतीला डहाणू पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीत दोन्ही बाजूला समान मते मिळाली होती. अखेर ईश्वरी चिठ्ठी टाकून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात शिवसेना-राष्ट्रवादीने बाजी मारली आहे, त्यामुळे डहाणू पंचायत समितीची जबाबदारी असलेले डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे गटाने मोखाडा पंचायत समितीच्या ताब्यात गेली आहे.

Shivsena-ncp
आव्हाडांना अटक करायला आलेले डीसीपी म्हणाले, ‘मी काही करू शकत नाही; वरून आदेश आहेत’

वाडा पंचायत समितीच्या सभापतीपदी अस्मिता लहांगे

वाडा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची शुक्रवारी बिनविरोध निवड पार पडली. सभापतीपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अस्मिता लहांगे यांची; तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला.

Shivsena-ncp
कसली नाराजी..? मी राष्ट्रवादीत नाराज नाही : त्या चर्चेवर अमोल कोल्हेंनी टाकला पडदा

पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत शिवसेनेकडून सभापतिपदासाठी अस्मिता लहांगे यांनी; तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वाडा पंचायत समितीत शिवसेना पाच, राष्ट्रवादी काँग्रेस चार, भाजप दोन व अपक्ष एक असे एकूण बारा संख्याबळ असून महाविकास आघाडीची सत्ता आहे. सत्ता स्थापन होताना ठरलेल्या वाटाघाटीनुसार तत्कालीन सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानुसार आज झालेल्या निवडणुकीसाठी विशेष सभेचे अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी भवानजी आगे पाटील यांनी काम पाहिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com