Shivsena : यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटप, शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठी खेळी, लोकसभेतील चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न!

Shivsena MLA Yamini Jadhav Burqa distribution : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केल्याच आता दिसत आहे. या संदर्भातील एक बॅनर भायखळा येथे लावण्यात आला होता. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Shivsena MLA Yamini Jadhav Burqa distribution
Shivsena MLA Yamini Jadhav Burqa distributionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 12 Sept : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षा कामाला लागले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून विविध आश्वासन दिली जात आहेत.

अशातच आता शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप करण्यात आलं आहे. शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून हे बुरखा (Burqa) वाटप करण्यात आलं आहे. त्यामुळे आता शिंदे गट लोकसभेतील आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केल्याच आता दिसत आहे. या संदर्भातील एक बॅनर भायखळा येथे लावण्यात आला होता. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बुरखा वाटप कार्यक्रमामुळे स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारी शिंदेसेनेला अचानक मुस्लिमांची आठवण कशी झाली? असा सवालही विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता या बुरखा वाटपावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Shivsena MLA Yamini Jadhav Burqa distribution
Nana Patole : आरक्षणविरोधी कोण आहे, हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची गरज नाही!

भायखळा येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर या मतदारसंघात प्रथमच मुस्लिम महिलांना बुरखा वाटप करण्यात येणार असल्याचं लिहिलं आहे. आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांच्यावतीने हा बॅनर लावण्यात आला आहे. तर यावर धर्माच्या आधारे संधी साधू राजकारण करत असल्याचा आरोपही विरोधक करत आहेत.

Shivsena MLA Yamini Jadhav Burqa distribution
Sanjay Raut: हे प्रोटोकॉल, संविधानाला धरून आहे का? चंद्रचूड अन् मोदींना राऊतांचा प्रश्न

महत्वाची बाब म्हणजे मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. याच मतदारसंघात लोकसभेला ठाकरे गटाचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत. त्यांना भायखळामधून मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याकांच मते मिळाली आहेत. त्यामुळे लोकसभेला मुस्लिम समाजाने आपणाला डावललं त्याप्रमाणेच आता विधानसभेलाही हा समाज आपल्यापासून लांब जायला नको यासाठी शिंदे गटाकडून मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाटप केल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com