Shivsena Politics : "शिवसेना जोडायची वेळ आली आहे..." ठाकरे-शिंदेंना एकत्र आणण्याचे शिंदेंच्या शिलेदाराने दिले संकेत

Thackeray Shinde Reunion : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर शिंदेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास चांगलाचं वाढला आहे. शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेसह इतर काही पक्षातील नेते पदाधिकारी शिंदेसेनेत येण्यासाठी इच्छुक असल्याचंही दिसत आहे.
Eknath shinde & Uddhav thackeray
Eknath shinde & Uddhav thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 01 Feb : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर शिंदेंच्या शिवसेनेचा (Shivsena) आत्मविश्वास चांगलाचं वाढला आहे. शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेसह इतर काही पक्षातील नेते पदाधिकारी शिंदेसेनेत येण्यासाठी इच्छुक असल्याचंही दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या शिंदे गटाने 'ऑपरेशन टायगर' सुरु केल्याचं बोललं जात आहे.

मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील मोठे नेते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. ठाकरेंचे नेते आपल्याकडे घेण्यासाठी शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवलं जात असल्याचं बोललंत जात असतानाच ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्याबाबतचं मोठं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना, "आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधलं अंतर वाढलं नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना (Shivsena) जोडता येतील", असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खरंच ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Eknath shinde & Uddhav thackeray
New Tax Regime 2025 : मध्यमवर्गासाठी मोदींची मोठी भेट; 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न केले करमुक्त

तसंच दोन शिवसेना झाल्याचं फार दुःख होत असून संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र प्रयत्न एका बाजूने करून चालणार नाही, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. मागील अनेक दिवसांपासून भाजपने एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) डावलल्याच्या चर्चा सुरू आहेत.

तर तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजप आणि ठाकरे गट शिंदेंना काही संदेश देतंय का? अशा चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आता शिंदेच्या शिलेदाराने ठाकरेंशी जवळीक करण्याबाबतचं वक्तव्य केल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Eknath shinde & Uddhav thackeray
Shiv Sena Operation Tiger : शिवसेनेचे 'ऑपरेशन टायगर'; एकनाथ शिंदेंची पुण्यासाठी वेगळी रणनीती

शिंदेसेनेचं 'ऑपरेशन टायगर'

एकीकडे ठाकरें आणि शिदेंना आता जोडण्याची वेळ आली आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पुण्यातील (Pune) माजी आमदार महादेव बाबर यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. तर कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आता ठाकरेंची शिवसेना काय प्रतिक्रिया देणार आणि भूमिका काय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com