Supriya Sule : 'मविआ'तील ठाकरेंच्या शिवसेनेची स्वबळावर लढण्याची घोषणा, सुप्रिया सुळेंचं सूचक विधान, दिले मोठे संकेत

ShivsenaUBT Big Decision On Local Body Election: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह मुंबई महानगर पालिकेची निवडणुकीतील उद्धव ठाकरेंचा पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे संकेत नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.
Supriya Sule 1
Supriya Sule 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडी फुल फॉर्मात आली होती. पण विधानसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर आघाडीत मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, आणि शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षांकडून अपयशाला जबाबदार धरत एकमेकांवर हल्लाबोल करण्यात येत आहे.

अशातच आता ठाकरेंनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली आहे.आता याच घोषणेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं विधान केलं आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनीदेखील आघाडीतील समन्वयावर बोट ठेवत मोठी टिप्पणी केली होती.

राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत फूट पडल्याची चर्चा जोर धरू लागली असतानाच आता शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीला मोठा दणका दिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह मुंबई महानगर पालिकेची निवडणुकीतील उद्धव ठाकरेंचा पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे संकेत नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. हा शरद पवार आणि काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहे.

Supriya Sule 1
Suresh Dhas : ड्रग्स तस्करींमधील गुन्हेगारांबरोबर 'मेन आकां'चा दाखवला फोटो; आमदार धस यांनी मंत्री मुंडेंच्या अडचणी वाढवल्या

खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्वबळाच्या निर्णयावर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. त्या म्हणाल्या,महापालिकेच्या निवडणुका,जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही आगामी सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्याचे हे संकेत तर नाही अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

सुळे म्हणाल्या, सर्वच निवडणुका जर प्रत्येकजण आपआपल्या सोयीनं लढवायला लागलं तर कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलायच्या का? मग त्यांना न्याय कधी मिळणार?असा प्रतिसवाल उभा करत एकप्रकारे ठाकरेंच्या निर्णयाचं समर्थनच केलं.तसेच यावेळी त्यांनी महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते,त्यामुळे त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे,असंही खासदार सुळे यांनी सांगितलं.

Supriya Sule 1
Manoj Jarange Patil : '...अन्यथा करेक्ट कार्यक्रम करू', मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारसह धनंजय मुंडेंना इशारा

यापूर्वी आघाडीत असतानाही महापालिकेच्या निवडणुका आम्ही वेगवेगळ्याच लढत होतो. याआधीची महापालिका निवडणुकसुध्दा आम्ही वेगवेगळीच लढलो होतो.त्यात नवीन काय आहे? अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

'..याचा फटका 100 टक्के बसणार!'

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार फायरब्रँड नेते जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊतांच्या स्वबळाच्या निर्णयावर तीव्र नाराजी दर्शवली आहे.ते म्हणाले, आमच्यासुध्दा कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही.मात्र,लोकसभा,विधानसभा निवडणुकीत मतविभागणीचा फटका बसल्याचं आपण पाहिलं आहे. त्यामुळेच 45 जागा गेल्या.

Supriya Sule 1
Suresh Dhas : गुन्हा दाखल करू नका म्हणणारच मुख्य आरोपी; धाराशिवमध्ये सुरेश धस यांचा मोठा दावा

परंतु,उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचीच इच्छा असेल स्वबळावर लढवायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण? विधानसभेच्या पराभवानंतर खरंतर आम्ही एकत्रित राहायला हवं होतं.आता त्यांच्यावर टीका करण्यात काहीच अर्थ नाही.कारण तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे.पण याचा आगामी पालिका निवडणुकीत याचा फटका 100 टक्के बसणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com