Suresh Dhas : गुन्हा दाखल करू नका म्हणणारच मुख्य आरोपी; धाराशिवमध्ये सुरेश धस यांचा मोठा दावा

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्हयातील सरपंच हत्याप्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना शनिवारी धाराशिव जिल्ह्यात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या, अशा मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
Suresh Dhas
Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी संतोष देशमुख यांची फिर्याद घेऊ नका व गुन्हा दाखल करू नका, असा फोन एका नेत्याने पोलीस ठाण्यात केला होता. हाच गुन्हा दाखल करू नका म्हणणारच, या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा मोठा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी यावेळी केला.

बीड जिल्हयातील सरपंच हत्याप्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना शनिवारी धाराशिव जिल्ह्यात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या, अशा मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी धस बोलत होते.

Suresh Dhas
Santosh Deshmukh Murder Case : बीड पोलिस, 'CID', 'SID'कडून निसटला 'हा' गंभीर मुद्दा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोग 'अ‍ॅक्शन मोड'वर

यावेळी भाजप (Bjp) आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. त्यांनी आकाच्या आकाला जेलमध्ये टाका अशी मागणी केली. तर आकाचा आका म्हणतो, माझा काही संबंध नाही, पण खरा सुत्रधार तोच असल्याचा घणाघात त्यांनी केला.

Suresh Dhas
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख खूनप्रकरणी सीआयडीची मोठी कारवाई; सातही आरोपींवर मोकाची कारवाई

आरोपींनी अमानुष पद्धतीने संतोष देशमुख यांना मारले. त्याचा व्हिडिओ काढला. दुसरीकडे आका सांगत होता आणखी मारा. संतोष देशमुख याला का मारले? तर खंडणीच्या मध्ये तो आला होता. संतोष देशमुख यांची हत्या दीड कोटी रुपयांसाठी झाली. कारण 50 लाख या लोकांनी निवडणुकीत घेतले होते. दलित व्यक्तीला वाचवण्यासाठी संतोष देशमुख आले. त्यामुळे त्याला मारले, असे आमदार धस (Suresh Dhas) म्हणाले.

Suresh Dhas
Nitesh rane : नितेश राणेंचे ठीक आहे पण संयमी सुरेश खाडेंकडूनही द्वेषांची भाषा...

आमदार धस यांनी वाल्मिक कराडवरही मोक्का लावा, अशी मागणी केली. ऍट्रॉसिटी दाखल करू नका म्हणून ज्या आकाने कॉल केला त्याला आरोपी करा. काही लोक आधी म्हणतात मी असं करेन, तसं करेन. पण जेव्हा बिन भाड्याच्या खोलीत गेले की सगळे गार होतात. मुख्यमंत्री साहेबांनी आमचं सगळं ऐकले आहे. मोक्का लावतो म्हणाले तो ही लावला. आता 7 जणांना मोक्का लागलाय, पण राहिलेल्या बोकाला पण मोक्का लागला पाहिजे, असे सुरेश धस म्हणाले.

Suresh Dhas
Devendra Fadnavis : राणें-खाडेंची विधाने ठरणार का फडणवीसांच्या वाटेतले काटे?

संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नाही. आता सुरेश धस यांनी वाल्मिक कराडलाही मोक्का लावावा अशी मागणी केली आहे. आज धाराशिवमध्ये ते बोलत होते.

Suresh Dhas
Satej Patil : सतेज पाटलांचे मोठे विधान; म्हणाले, 'प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, वेगळे लढल्याने...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com