
थोडक्यात बातमीचा सारांश:
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीने चार तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.
या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि त्यांच्या बंधूंच्या कॉल डिटेल्सची मागणी झाली आहे.
शिवसेना (शिंदे गट) कडून पोलिसांना निवेदन देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
Sangli News : सांगली जिल्हा सुन्न करणारी घटना काहीच दिवसांपूर्वी घडली होती. जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एका गावात दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. तिने गावातील चार तरूणांच्या मानसिक आणि शारीरीक त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले होते. या चार पैकी एकाने तिचा बलात्कार केला होता. तसेच त्या घटनेचा व्हिडिओ तयार केला होता. त्याचाच वापर करून तिला सतत त्रास दिला जात होता. आता या प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली असून हे प्रकरण दाबण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात तपास होण्यासाठी भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स गृहविभागाने मागवावेत, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आता केली जातेय. याबाबत आटपाडी पोलिसांना निवेदन देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Minor Girl's Suicide in Sangli Sparks Political Storm: Shiv Sena Demands Padalkar Brothers’ Call Records)
आटपाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नव्हती. उलट ग्रामस्थांनी चार पैकी दोघांना पकडले होते. त्यातील एकाला चांगलाच चोप दिला होता. त्यानंतर पोलिसांकडे दिले होते. पण संध्याकाळपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. पोलिसांनी आत्महत्याचे कारण नोंद केले होते. पण पिडितेचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रात्री 11 पर्यंत पोलिस स्टेशनच्या दारात मृतदेहासह ठिय्या मारल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे या प्रकरणात राजकीय दबावाचा वास अनेकांना येत होता.
आतातर शिवसेनेनंच याबाबत संशय व्यक्त केला असून थेट पडळकर बंधुंकडे बोट दाखवले आहे. तसेच यांचे यांचे कॉल डिटेल्स गृहविभागाने मागवावेत, अशी मागणी केली आहे. याबाबतचे आटपाडी पोलिसांना शिवसेनेचे तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, युवासेना प्रमुख मनोज नांगरे, दत्तात्रय पाटील, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी निवेदन दिले आहे.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात, आटपाडी तालुक्यातील एका गावातील दहावीमध्ये शिक्षणाऱ्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. यामागे काही तरुणांचा सातत्याने होणारा त्रास, लैंगिक अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकी कारणीभूत आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून ती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांत चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर याबाबत अधिवेशनात देखील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी आवाज उठवला होता. त्यांनी पिडित मुलीला व तिच्या नातेवाइकांना न्याय देण्यासह दोषींवर कडक कारवाईची मागणी केली होती. तसेच या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा दावा केला होता. तर याची सखोल चौकशी व्हावी अशीही मागणी केली होती.
त्यामुळे आता या घटनेत कोणाचा हस्तक्षेप का? हे उजेडात आणण्यासाठी पोलिस निरीक्षकांचे आधी कॉल डिटेल्स काढावेत. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता काय? हे समोर येईल. तसेच अधिक तपास करण्यासाठी गृहविभागाने व पोलिस प्रशासनाने आमदार गोपीचंद पडळकर, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचे या घटनेच्या कालावधीतील कॉल डिटेल्स तपासावेत, अशीही मागणी या निवेदनातून केली आहे.
1. आत्महत्या करणारी मुलगी कोण होती?
– ती सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दहावीची विद्यार्थिनी होती.
2. कोणावर त्रास देण्याचा आरोप आहे?
– गावातील चार तरुणांवर मानसिक व शारीरिक त्रासाचा आरोप आहे.
3. राजकीय हस्तक्षेपाचा आरोप कोण करत आहे?
– शिंदे गटाच्या शिवसेनेकडून भाजप आमदार गोपिचंद पडळकर व त्यांच्या बंधूंवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
4. पोलिसांना काय मागणी करण्यात आली आहे?
– आरोपींच्या कॉल डिटेल्स गृहविभागाने मागवावेत अशी लेखी मागणी करण्यात आली आहे.
5. या प्रकरणाचा पुढे काय होऊ शकते?
– कॉल डिटेल्सची चौकशी, राजकीय हस्तक्षेपाची सखोल तपासणी आणि संबंधितांवर कारवाईची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.