Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचा तोल सुटला, बनियन, टाॅवेलवर कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला धु धू धुतले!

Sanjay Gaikwad Assaults Canteen Worker : पावसाळी अधिवेशन सुरू असल्यानेसंजय गायकवाड हे आकावशवाणी आमदारा निवासत मुक्कामी आहेत. मंगळवारी रात्री त्यांनी कॅन्टीनमध्ये जात त्यांनी तेथील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.
Sanjay Gaikwad Assaults Canteen Worker
Sanjay Gaikwad Assaults Canteen Workersarkarnama
Published on
Updated on

Sanjay Gaikwad News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली. निकृष्ट जेवण दिल्याच्या रागातून त्यांनी मारहाण केली.

पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने संजय गायकवाड हे आकाशवाणी आमदार निवासात मुक्कामी आहेत. मंगळवारी रात्री आपल्याला निकृष्ट आणि शिळे जेवण दिल्याचे सांगत कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या कानाखाली तसेच त्याच्या ठोसा मारला. संतप्त झालेल्या गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला देखील धारेवर धरले.

आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट जेवण मिळत असल्याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे म्हटले आहे.

आमदार गायकवाड हे आपल्या वादग्रस्त विधानाने सातत्याने चर्चेत असतात. ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे उदाहरण देताना त्यांनी अपशब्द वापरले होते. त्यानंतर त्यांनी लगेच माफी मागत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या वादाला दोन दिवसही होत नाहीत तोच त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे समोर आले.

Sanjay Gaikwad Assaults Canteen Worker
Shivsena Vs NCP : तटकरेंनी रायगडची हद्द ओलांडली; सामंतांनी लगेचच उट्टे काढले...

टाॅवेल आणि बनियनवर कॅन्टीनमध्यो पोहोचले

आमदारा निवासात मुक्कामी असलले आमदार संजय गायकवाड यांना जेवण मिळताच ते संतप्त झाले. आणि थेट टाॅवेल आणि बनियनवर कॅन्टीनमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी कॅन्टीमधील कर्मचाऱ्याला भाजीचा वास घेण्यास सांगितले. तसेच निकृष्ट जेवण देता का म्हणत कर्मचाऱ्याला मारहाण केली. ते मारहाण करत असताना काही जणांनी त्यांचा व्हिडिओ शूट केला.

Sanjay Gaikwad Assaults Canteen Worker
Gopichand Padalkar : धर्मांतरच्या विरोधात गोपीचंद पडळकरांनी उघडली नवी मोहीम, पुण्यात केली मोठी घोषणा, नोकरी करणाऱ्यांना...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com