उद्धव ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान; हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा!

Uddhav Thackeray|Shivsena|BJP : उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती.
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray Latest News
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray Latest News Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळाली आहे. शिवसेनेचे (Shivsena) नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करून भाजपच्या (BJP) समर्थनाने सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याबरोबरच त्यांनी आज (ता.4 जुलै) विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक आज शिवसेना भवनमध्ये बोलावली होती. या बैठकीत ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले तर बंडखोर आमदार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही चुकीचे असू तर जनता आम्हांला घरी बसवेल आणि तुम्ही चुकीचे असाल तर जनता तुम्हांला घरी बसवेल मात्र, यासाठी हिंमत असेल भाजपने मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. (Uddhav Thackeray Latest Marathi News)

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray Latest News
आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन नाही जन्मलो, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला...

ठाकरे यांनी बैठकीत भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. मात्र, आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर आपण चुकत असेल, तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल, तर जनता तुम्हाला घरी बसवेल. मात्र, हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे थेट आवाहन त्यांनी भाजपला केले. तर दुसरीकडे विधिमंडळाच्या चालू घडामोडींवर ते त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, सध्या विधानसभेत सुरु असलेल्या घडामोडींवर घटनातज्ज्ञांना माझी विनंती आहे की, जे काही विधिमंडळात सुरू आहे याबाबत आपण आपली भूमिका स्पष्ट करावी. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याबाबत सर्वांना सत्य बोलू द्या, असे ठाकरे म्हणाले.

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray Latest News
गोपीनाथ मुंडेंच्या सांगण्यावरून मी धनंजय मुंडेंनाही मतं दिलंय : ठाकूरांनी सांगितले गुपीत

दरम्यान, शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी पुन्हा पक्ष संघटनेवर लक्ष केद्रिंत केलेलं पाहायला मिळत आहे. यामुळे त्यांनी थेट शिवसैनिकांशी बैठका आणि सामान्य शिवसैनिकांशी भेटीचा सपाटा लावला आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून त्यांनी आज शिवसेना भवनात जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडत जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले.

ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • लढायचे असेल तर सोबत राहा

  • भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे.

  • असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ, आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल, तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल.

  • घटना तज्ज्ञांना विनंती आहे आपण घटनातज्ञ आहात, सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका मांडा

  • देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्या

  • विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com