Aditya Thackeray : बंगालमधील रेल्वे अपघातानंतर आदित्य ठाकरेंच्या रडारावर अश्विनी वैष्णव; म्हणाले, आपल्या खात्याचं वाटोळं...

Aditya Thackeray On Kanchanjunga Express Train Accident : भाजपने नुकतीच अश्विनी वैष्णव यांची महाराष्ट्राच्या सहप्रभारी पदी नियुक्ती केली आहे. अशातच पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघात झाला आहे. यावरुन आदित्य यांनी भाजपवर निशाणा साधला.
Ashwini Vaishnav, Aditya Thackeray
Ashwini Vaishnav, Aditya ThackeraySarkarnama

Mumbai News, 18 June : एनडीए सरकारचा खेळ कमीत कमी सहा ते आठ महिने होणार, या काही महिन्यात अनेक खासदार भाजपमधून बाहेर पडणार आहेत, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि महायुती सरकावर घणाघात केला.

भाजपने नुकतीच अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांची महाराष्ट्राच्या सहप्रभारी पदी नियुक्ती केली आहे. अशातच पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघात झाला आहे. यावरुन आदित्य यांनी भाजपवर निशाणा साधला.

ते म्हणाले, आपण पाहिलं असेल की गेल्या सहा-सात महिन्यात अनेक रेल्वे अपघात झाले. पण रेल्वे मंत्री आहेत, ते रील मंत्री म्हणून दिसत आहेत. हे सगळं होत असताना महाराष्ट्रात त्यांना भाजपचं (BJP) प्रभारी पद देत आहेत.

त्यांच्याकडे महत्वाचं खातं असताना, देशात एवढं कामं असताना, आज एका राजकीय निवडणुकीत त्यांना व्यस्त करतायत. मग जगातील सगळ्यात मोठ्या पक्षाकडे प्रभारी पद देण्यासाठी लोकं नाहीत का? आपल्या खात्याचं वाटोळं केल्यानंतर त्यांना आता प्रभारी केलं जातं आहे. मग कमीत कमी तुम्ही नवीन मंत्री तरी नेमा."

Ashwini Vaishnav, Aditya Thackeray
Dhairyasheel Mane : पावसात 'मशाल' विझली, पण आपण वादळात...; धैर्यशील माने ठाकरे गटावर बरसले

सहा ते आठ महिन्यांचा खेळ

दरम्यान, एनडीए सरकारचा खेळ कमीत कमी सहा ते आठ महिने होणार, या काही महिन्यात अनेक खासदार भाजपमधून बाहेर पडणार आहेत. कारण जे देशात सुरू आहे ते कोणाला पसंत नाही. भाजपची अजून संसदीय मंडळीच्या बैठक झालेली नाही.

इंडिया आघाडी 237 च्या वर आणि भाजपला 240 जागा आहेत. जे दोन मित्र पक्ष तिकडे गेले आहेत त्यांना आजही आम्ही सांगत आहे की, लोकसभा अध्यक्ष पद हे दोघांपैकी एकाकडे घ्या. जर ते भाजपकडे गेलं तर ते तुमचे पक्ष फोडतील.

Ashwini Vaishnav, Aditya Thackeray
Assembly Legislative Council Election : मोठी बातमी! विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर

यावेळी आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) अनेक लोक राज्यातील सत्तेमधून बाहेर पडण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा केला. मिंधे सरकारने महाराष्ट्राचं वाटोळ केलं आहे. ज्यांना ज्यांना महाराष्ट्राची चिंता आहे ते या सरकारमधून बाहेर पडतील.

महाराष्ट्र प्रेमी लोक भाजपमधून आणि फुटलेल्या राष्ट्रवादीमधून बाहेर पडतील. तसंच शिंदे गटातील नेते ठाकरे गटात येण्यासाठी इच्छुक आहेत. ते ठाकरे गटात येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र गद्दारांना पुन्हा आम्ही घेणार नसल्याचंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com