विधानसभेच्या सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. लोकसभेच्या निकालानंतर आणि विधानसभेच्यापूर्वी होणाऱ्या या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळू शकते.
विधानपरिषदेच्या 11 विद्यमान सदस्यांच्या आमदारकीची सहा वर्षांची मुदत जुलैअखेर संपणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं कार्यक्रम जाहीर केला आहे. 12 जुलैला मतदान विधानपरिषदेसाठी मतदान पार पडणार आहे. तर, अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 जुलै आहे.
विधान परिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर, नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणूक 26 जून रोजी होणार आहे. त्यानंतर लगेच ही निवडणूक होईल. त्यामुळे 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत फोडाफोडीच्या राजकारणाला उत येणार आहे.
'या' आमदारांचा कार्यकाळ संपणार
बाबाजानी दुर्राणी ( अजित पवार गट ), वजाहर मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), मनीषा कायंदे (शिंदेसेना), अनिल परब (उद्धवसेना), भाई गिरकर, नीलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), जयंत पाटील (शेकाप) आणि महादेव जानकर (रासप) या 11 विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.