MLA Disqualification Result : हरलेल्या व्यक्तींना नेहमी विजयी संघ किंवा व्यक्ती चुकीचा दिसतो...!

Kalyan district chief Gopal Landge's advice to Uddhav Thackeray : कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला...
Gopal Landge, Uddhav Thackeray
Gopal Landge, Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

- भाग्यश्री प्रधान

MLA Disqualification Result : हरलेल्या व्यक्तींना नेहमी समोरचा चुकीचा दिसतो, अशी टीका उद्धव ठाकरेंवर करीत आज विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केले. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार पात्र ठरले. याचा संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांनी ढोल- ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला.

यावेळी डोंबिवलीतील शिवसेना शाखेतदेखील जल्लोष केला. यावेळी लांडगे यांनी हे वक्तव्य केले. डोंबिवली येथील मध्यवर्ती शाखेत जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले, अखेर सत्याचा विजय झाला असून याबाबत नार्वेकर यांचे समस्त शिवसैनिक आभार मानत आहेत. हा विजय जनतेचा असून जनता ही शिवसैनिकांच्या आनंदात सहभागी झाली.

Gopal Landge, Uddhav Thackeray
MLA Disqualification Result : निकालानंतर संजय राऊत कडाडले, बेकायदा विधानसभाध्यक्षांनी...

मुख्यमंत्री शिंदे कायमच कामाला महत्त्व देतात आणि विरोधकांना कामातून उत्तर देतात, त्यांचे हेच वर्तन लोक मान्य करीत आहेत, तर शहरप्रमुख राजेश मोरे यांनी या निर्णयाबद्दल नार्वेकरांचे आभार मानले. डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेजवळील छत्रपाती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला. शिवसेनेतून शिंदे बाहेर पडले, त्यावेळी त्यांच्यासोबत ते 40 आमदारांना घेऊन सुरतला गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर गुवाहाटी, गोवा करीत ते पुन्हा महाराष्ट्रात आले आणि अखेर भाजपशी हात मिळवत शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू होते. अचानक झालेल्या सत्तांतरामुळे आमदार अपात्रतेचा मुद्दा आला.

या सगळ्या प्रकरणात आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांना पात्र ठरवले. सध्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज दिसले, तर शिंदे गटाचे कार्यकर्ते पेढेवाटप करून जल्लोष साजरा करीत आहेत.

(Edited by Amol Sutar)

R...

Gopal Landge, Uddhav Thackeray
Beed Political : बीडवर माझे विशेष लक्ष; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकाला शब्द...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com