नार्वेकरांसमोरच शिवसेनेच्या आमदारानं केलं भावी मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर..

हा सगळा प्रकार शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वेसर्वा मिलिंद नार्वेकरांच्या डोळ्यादेखतच घडल्याने पोतनीसांना थोडे अवघडल्यासारखेच वाटले.
Anil Parab
Anil Parabsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री पदावरुन शिवसेनेत छुपी स्पर्धा वाढत चालली आहे. ठाकरे सरकारमध्ये दबदबा असलेले राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचेही नाव परबांच्या समर्थक आमदाराने शनिवारी जाहीर केले आणि शिवसेनेच्याच नव्हे, तर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला नवा मुद्दा सापडला.

एका जाहीर कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस (Sanjay Potnis)यांनी परब यांचा ''भावी मुख्यमंत्री'' असा उल्लेख केला; त्यानंतर कार्यक्रमातील पाहुणे मंडळी अचंबित झाल्याचे पाहून परबच काय, स्वतः पोतनीसही काही क्षण बुचकळ्यात पडले. मी गंमतीने तसा उल्लेख केल्याचे सांगून पोतनीस यांनी माध्यमांना आपल्यातील मिश्किलपणा दाखवत, सारवासारव केली.

हा सगळा प्रकार शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वेसर्वा मिलिंद नार्वेकरांच्या (Milind Narvekar) डोळ्यादेखतच घडल्याने पोतनीसांना थोडे अवघडल्यासारखेच वाटले. परंतु, मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत असल्याचे दाखविण्यापासून यात उतरण्याची किंवा आपल्या समर्थक आमदारांकरवी नाव चर्चेत ठेवायची, त्यातून नव्या राजकारणाची जुळवाजुळव करण्याचा आटापिटा शिवसेनेतील जुने-जाणते करीत असल्याची बाब यानिमित्ताने उघड झाली.

Anil Parab
राज ठाकरेंनी मोदीचं कैातुक केलं तरी यांच्या पोटात दुखतं ; दानवेंचा विरोधकांना टोला

याआधीही छुप्या पद्धतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही नावाची चर्चा पुढे आली होती. त्यात पोतनीस यांच्या मिश्किलपणामुळे परबांचीही भर पडल्याचे दिसत आहे. राज्यातील सत्तासंघर्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री बदल्याच्या अफवा होत्या. त्याचा फायदा विरोधकांनीही मुख्यमंत्रीपद इतरांकडे सोपविण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यानंतर खरोखरीच ठाकरे हे पद सोडणार का, असे तर्कविर्तक लढवले जात होते.

त्यावेळी मुख्यमंत्री बदलण्याची सुतराम शक्यता नसतानाही शिवसेनेतील काही नेत्यांच्या नावे चर्चेत आली. त्यावरून शिवसेनेतील गटातटाचे राजकारण लपून राहिले नसल्याचे बोलले गेले. अशातच शिवसेनेतील त्यातही पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील परब यांनाच पोतनीस यांनी भावी मुख्यमंत्री केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून परब यांचे राजकीय वजन वाढले आहे. परिणामी, मातोश्रीपासून वर्षा आणि मंत्रिमंडळातही परबांना मोठे महत्त्व आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या विरोधकांच्या चाली हाणून पाडण्याच परबांची वकिली कामी येत असल्याचे दिसून आले आहे.

Anil Parab
धक्कादायक : पोलीस ठाण्यातच महिला पोलीस असुरक्षित ; हवालदारानेच केला विनयभंग

विरोधकांच्या हल्ल्यांसाठी परबांचा पूरेपूर करून घेत, शिवसेनेही त्यांना ताकद दिली आहे. परब समर्थक पोतनीस यांनी तर थेट मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरविले. सुप्रीमो चपक स्पर्धेच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. माजी माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, परब, पोतनीस, नार्वेकर यांच्यासह काही पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते. स्पर्धेचे हे नववे वर्षे आहे. परब आणि पोतनीस या दोघांच्या पुढाकारातून स्पर्धेचे आयोजन केले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com