फडफडू नका, पिसं गळतील ; राऊतांनी सोमय्यांना सुनावलं, आणखी घोटाळे काढणार

"सोमय्या यांच्या विक्रांत आणि टॉयलेट घोटाळ्यापेक्षा मोठे घोटाळे बाहेर काढणार," असा इशारा राऊतांनी दिला.
Sanjay Raut on Kirit somaiya, Sanjay Raut Latest News in Marathi, Kirit somaiya Latest News
Sanjay Raut on Kirit somaiya, Sanjay Raut Latest News in Marathi, Kirit somaiya Latest Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : "ठाकरे सरकारमधील मंत्री असो की, ठाकरे परिवारातील कोणी असो, घोटाळा करणाऱ्यांना सोडणार नाही. मंत्र्यांचे नंबर लागले आहेत, आता ठाकरे परिवाराचा नंबर आहे, असा इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रविवारी एका कार्यक्रमात दिला आहे. त्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Sanjay Raut on Kirit somaiya)

खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर आज गंभीर आरोप केले. "सोमय्या यांच्या विक्रांत आणि टॉयलेट घोटाळ्यापेक्षा मोठे घोटाळे बाहेर काढणार," असा इशारा राऊतांनी दिला. संजय राऊतांनी आज सकाळीच सोमय्यांविरोधात दोन टि्वट करुन हल्लाबोल केला आहे.

सोमय्या हे युद्धनौका विक्रांत भष्ट्राचारातील आरोप आहेत, 'फडफडू नका, पिसं गळतील,'अशा शब्दात सोमयांना त्यांनी सुनावलं. ते माध्यमांशी बोलत होते. ईडीवरही राऊतांनी यावेळी टीका केली.

Sanjay Raut on Kirit somaiya, Sanjay Raut Latest News in Marathi, Kirit somaiya Latest News
NIA raid : दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांवर वीस ठिकाणी छापे

आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्यांनी निधी जमवला होता. या निधीत सोमय्यांनी अपहार केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यापूर्वी केला आहे. या प्रकरणात सोमय्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

एका टि्वटमध्ये 'ही खंडणी नाही का' असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभाग, सेबी यांच्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला कोट्यवधींचा निधी कसा काय मिळाला की हा काळा पैसा पांढरा करण्याचा घाणेरडा डाव आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केला. याचा हिशोब द्यावाच लागणार असल्याचे त्यांन म्हटले. धर्मादाय आयुक्त आणि तपास यंत्रणांकडे याबाबत तक्रार केली असल्याचे राऊतांनी म्हटले.

Sanjay Raut on Kirit somaiya, Sanjay Raut Latest News in Marathi, Kirit somaiya Latest News
जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका ? नवीन प्रभाग रचनेचा प्रश्न लवकर मार्गी लागणे अशक्यच

किरीट सोमय्या यांनी वर्ष 2013-14 मध्ये एका कंपनीविरोधात आरोप केले होते.त्यानंतर कंपनीच्या प्रमुखाची ईडीने चौकशीदेखील केली. त्यानंतर 2018-19 मध्ये सोमय्या यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानला याच कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. क्रोनोलॉजी समजिए असं म्हणत राऊत यांनी आपण या प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com