आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकींनंतर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासह अशोक चव्हाणांच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे. आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांवर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत यांनी 'एक्स' अकाउंटवर ट्विट केलं आहे. "अशोक चव्हाणसुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?" असा खोचक सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संजय राऊत ट्विटमध्ये म्हणाले, "अशोक चव्हाण भाजपवासी झाले. विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते... चर्चा करीत होते... आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाणसुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते!"
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाष्य केलं आहे. "काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वादावर समन्वय घडवण्याची क्षमता नेतृत्वात नाही. त्यामुळे अशोक चव्हाणांनी कोणत्या कारणाने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला, हे पाहावं लागणार आहे. काँग्रेसमधील मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत," असं बावनकुळेंनी म्हटलं.
अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर बावनकुळे म्हणाले, "भाजपचा अध्यक्ष या नात्यानं अद्याप कुठलीही चर्चा झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे. विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी भाजपचा दुपट्टा, विचारधारा कुणी स्वीकारत असेल, तर स्वागत आहे."
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.