नाना पटोलेंवर शिवसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसही नाराज? आघाडीविरोधी वक्तव्यांमुळे रोष

Nana Patole | नाना पटोले यांच्यावर स्वपक्षातूनही नाराजी
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

(Nana Patole latest News)

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि खुद्द काँग्रेसमधीलच (Congress) नेते नाराज असल्याची माहिती मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने आघाडीविरोधी वक्तव्य केल्याने नाना पटोले यांच्यावर स्वपक्षातूनही नाराजी ओढविल्याचे सांगण्यात येत आहे.

नाना पटोले जेव्हा पासून प्रदेशाध्यक्ष झालेत तेव्हा पासून मित्रपक्षावर सतत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत आणि याचा फटका आघाडीला बसतो असे काही नेते खाजगीत मत व्यक्त करत आहेत. यापूर्वी देखील काँग्रेसमधील नेत्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. त्यावेळी काही नेत्यांनी दिल्ली दरबारी पटोलेंची तक्रार देखील केली होती. (Nana Patole Latest News)

भंडारा - गोंदिया अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक निकालावरुन राष्ट्रवादीशी पंगा

भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वादावर पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसत भाजपला साथ दिली असल्याचा आरोप केला होता. याशिवाय त्यांनी हा वाद हायकमांडच्या देखील कानावर घातला होता. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही तक्रार केली असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले होते.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली आहे. पण, राष्ट्रवादीची भूमिका नेहमी भाजपच्या बाजूने असते. राष्ट्रवादीकडून नेहमी सोनिया गांधींचा अपमान केला जातो. ज्या उद्देशाने महाविकास आघाडी स्थापन झाली त्या विचाराला तिलांजली देण्याचं काम राष्ट्रवादी कडून होत आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. याबाबत काँग्रेस हायकमांड लवकरच योग्य तो निर्णय घेणार आहे, असंही नाना पटोलेंनी सांगितलं होतं.

प्रभाग रचनेवरुन नाराजी :

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोयीने प्रभाग रचना करत आहेत असा आरोप करत नाना पटोले यांनी आपल्याच सरकारविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच मुंबईतल्या प्रभाग पुनर्रचनेबद्दलही नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, तीन पक्षांचं सरकार आहे, तेव्हा सगळ्या पक्षांचं मत विचारात घेऊन वॉर्ड रचना व्हायला हवी. सोबत राहून आपल्या मित्राचंच नुकसान होत असेल तर ते बरोबर नाही. आमच्या स्थानिक प्रतिनिधींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com