शिवसेना हाय अलर्टवर; मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक

CM Uddhav Thackeray| Mahavikas Aghadi| दिलीप वळसे पाटील आंबेगाव मतदारसंघाचा दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईकडे रवाना
CM Uddhav Thackeray Latest Marathi News
CM Uddhav Thackeray Latest Marathi News
Published on
Updated on

मुंबई : राज्यात विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC Election 2022) विरोधी पक्ष भाजपसह महाविकास आघाडीत जोरदार तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ४ वाजता शिवसेनेच्या सर्व आमदारांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर सर्व आमदार पवईच्या हाँटेल रेनिसन्समध्ये जाणार आहेत. (Uddhav Thackeray Latest Marathi News)

शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि समर्थक अपक्ष आमदारांना आज संध्याकाळी ४ वाजता सह्याद्री अतिथिगृहात बैठकीसाठी बोलवण्यात आलं आहे. यासोबतच शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना दोन दिवस राहण्याच्या तयारीसह येण्याच्याही सूचना दिल्या आहेत. थर भाजप आमदारांना हाॅटेल ताजमध्ये आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना पवईमधील हाॅटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. यासोबतच महाविकास आघाडीच्या प्रमुख मंत्र्यांना तातडीने मुंबईत बोलविण्यात आले आहे.

CM Uddhav Thackeray Latest Marathi News
राष्ट्रपती निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांची अशी आहे रणनीती

मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हेदेखील आपल्या आंबेगाव मतदारसंघाचा दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. राज्यात नुकतीच राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक झाली. पण या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला. आता सोमवारी ( ता. 20 ) होणाऱ्या विधानपरिषद निवडणूकीत दगाफटका टाळण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपकडून मुंबईतील पंचतारांकीत हॉटेल आरक्षित करण्यात येत आहेत. या हॉटेलांत आमदारांना दोन दिवस स्थानबद्ध करण्यात येईल. या हॉटेलांच्या आरक्षणाची राज्यभर चर्चा होत आहे.

विधानपरिषद निवडणुकीत मतदार फुटू नये यासाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना 18 जूनलाच मुंबईत बोलावून घेतले आहे. तर भाजपही त्यांचे आमदार 18 जूनपासून ताज हॉटेलमध्ये ठेवणार आहे. विधानपरिषद निवडणूक गुप्त असल्याने राजकीय पक्षांकडून हॉटेल बुक करून आमदारांवर लक्ष ठेवण्याचा प्रकार सुरू झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com