Shivsena Politics : दौऱ्याच्या आधीच ठाकरेंना रायगडमध्ये पुन्हा धक्का; उरणमधील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यापूर्वीच त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात धरून ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.
Uran Thackeray Faction party worker joined shivsena
Uran Thackeray Faction party worker joined shivsenaSarkarnama
Published on
Updated on

Raigad Political News :

उद्धव ठाकरे यांचा आज मावळ लोकसभा मतदारसंघाचा दौरा आहे. ते रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये सभादेखील घेणार आहेत. तत्पूर्वी काल (3 मार्च) ठाकरे गटाच्या उरण तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. यात नवघर, उरण, उलवे तसेच इतर विभागातील पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने उरण तालुक्यात ठाकरे गटासाठी नक्कीच वाईट बातमी आहे.

Uran Thackeray Faction party worker joined shivsena
CM Pramod Sawant: महायुतीत उमेदवारीवरून वादाची ठिणगी? मुख्यमंत्री म्हणाले,'नो कॉम्प्रोमाइज'

रायगडच्या उरण तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांची ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानी भेट घेतली आणि शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे उरणमधील ठाकरे गटाची ताकद घटली आहे. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आजच मावळ लोकसभा मतदारसंघात (Maval Loksabha Constituency) दौरा आहे. त्यांच्या दौऱ्याच्या सुरुवातीला ठाकरेंना हा धक्का बसला आहे. यात नवघर पंचायत समितीचे सदस्य दीपक ठाकूर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पाटील, उलवे नोडचे शहरप्रमुख प्रथम पाटील, शाखाप्रमुख विजय भिसे आणि युवासेनेचे क्षितिज शिंगरे आदींचा समावेश आहे. या वेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्केदेखील उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या वेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) दि. बा. पाटील यांचेच नाव देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे रायगड जिल्ह्याचा विकास होत आहे. नेरुळ ते उरण अशी उपनगरी रेल्वेसेवा नुकतीच सुरू झाली आहे. शिवाय वर्षभरात नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील सुरू होईल. त्यामुळे येथे अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्याचा फायदा स्थानिकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्याचवेळी उरणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

(Edited by Avinash Chandane)

R

Uran Thackeray Faction party worker joined shivsena
Lok Sabha Election 2024 News : मावळातील लोकसभा प्रचाराचे घाटावरील रणशिंग आदित्य, तर घाटाखाली उद्धव ठाकरेंकडून

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com