Sanjay Raut: राऊतांनी राणांबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यानंतर शिंदे गटातील प्रवक्त्या संतापल्या; म्हणाल्या, बाळासाहेब असते तर...

Jyoti Waghmare On Sanjay Raut: "महिलांचा अपमान होताना उद्धव ठाकरे गप्प का आहेत? कित्येकवेळेला महिला सन्मानाची बात करणाऱ्या सुषमा अक्का कुठे आहात तुम्ही? या महाराष्ट्रातील दमलेल्या बाबांच्या लेकी सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे मूग गिळून का बरं गप्प आहात? "
Sanjay Raut, Navneet Rana, Eknath Shinde
Sanjay Raut, Navneet Rana, Eknath ShindeSarkarnama

Sanjay Raut Controversial statement: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या अमरावती मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. राऊतांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून, भाजपने राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

अशातच आता शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारेंनी राऊतांवर सडकून टीका केली आहे. बाळासाहेब असते तर संजय राऊतांना जोड्याने हाणले असते, अशी टीका वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी केली आहे.

संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका करताना वाघमारे म्हणाल्या, नवनीत राणा यांच्या संदर्भात संजय राऊतांनी खालच्या पातळीची भाषा वापरली. जर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर राऊतांना जोड्याने हाणले असते. महाविकास आघाडीला लाज आणणारी वक्तव्ये संजय राऊतांनी केली आहेत. एखाद्या महिलेला नाची म्हणणे, तुम्हाला डोळे मारेल, बोलवेल अशी विधाने हा पुरोगामी महाराष्ट्र खपवून घेणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अक्का कुठे आहात तुम्ही?

हा शिवछत्रपतींचा, जिजाऊ, सावत्री, रमाईचा महाराष्ट्र आहे ना मग याच महाराष्ट्रात महिलांचा असा अपमान होताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गप्प का आहेत? कित्येकवेळेला महिला सन्मानाची बात करणाऱ्या सुषमा अक्का कुठे आहात तुम्ही? या महाराष्ट्रातील दमलेल्या बाबांच्या लेकी सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे (Supriya Sule and Praniti Shinde) मूग गिळून का बरं गप्प आहात? का फक्त स्वत:ची बुलंद कहाणी लिहण्यात व्यस्त आहेत.

लक्षात ठेवा रावणसुद्धा महाविद्वान होता. पण सीतामाईचा अपमान केला आणि रावणाची सोन्याची लंका जळाली. सामर्थ्यवान असणारं हस्तिनापूरसुद्धा द्रौपदीच्या अपमानाने उद्ध्वस्त झालं होतं आणि महाविकास आघाडीची लंका ही संजय राऊताच्या अशा बेताल बडबडीमुळेच जळून जाणार आहे.

Sanjay Raut, Navneet Rana, Eknath Shinde
Sanjay Raut: राऊतांनी राणांना पुन्हा हिणवलं; नटीला नटी नाही तर काय म्हणणार? गणपत पाटलांना प्रेमाने नाच्या म्हणतोच की...

कारण महाराष्ट्राला महिलांचा अपमान सहन होणार नाही. इथून पुढे जर संजय राऊत एखाद्या महिलेला नाची म्हणणार असतील तर संजय राऊत तुम्हाला महाविकास आघाडीचा नाचा म्हणायचे का? महाराष्ट्रातील महिला संजय राऊत याची जोड्याने पूजा बांधतील, अशी टीका ज्योती वाघमारे यांनी केली आहे. दरम्यान, एकीकडे राऊतांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं असतानाच राऊत मात्र आपल्या विधानावर ठाम असल्याचं पाहायला मिळालं आहे.

Sanjay Raut, Navneet Rana, Eknath Shinde
Sanjay Raut News : "संजय राऊत अन् उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या 10 जनपथमधील दरबारात नाचतात"

नटीला नटी म्हणणार नाही तर काय म्हणणार?

सांगली दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी, नटीला नटी म्हणणार नाही तर काय म्हणणार? नटीच म्हणणार ना, ती डान्सर आहे. आम्ही गणपत पाटलांना प्रेमाने नाच्या म्हणतोच की, मला एक्ट्रेस म्हणायला मला इंग्लिश येत नाही, त्यामुळे नटी म्हणलो. अशी सारवासारव राऊतांनी केली आहे. एवढ्यावरच राऊत थांबले नाहीत तर माध्यमांशी मी पत्रकार आहे, मी संपादक मला कुणी मराठी भाषा शिकवू नये, असंही राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे राऊतांना आपल्या वक्तव्याचा खेद नसल्याचं पाहायला मिळत आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com