Shivsena : ठाकरेंचा शिलेदार भरसभागृहात एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हणाला; "शिंदेसाहेब आपल्या दोघांना मिळून काहीतरी..."

Milind Narvekar statement : ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव आणि विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली. यावेळी त्यांनी वाघाची शिकार आणि तस्करी करणाऱ्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचा, आसामच्या धर्तीवर राज्यात कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी केली.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 25 Mar : ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव आणि विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली. यावेळी त्यांनी वाघाची शिकार आणि तस्करी करणाऱ्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचा, आसामच्या धर्तीवर राज्यात कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी केली.

ही मागणी करताना त्यांनी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) उद्देशून केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. वाघांच्या तस्करी संदर्भात कायदा करावा याबाबतची मागणी करताना नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून "शिंदे साहेब माझं ऐका, आपल्या दोघांना मिळून काहीतरी करावं लागेल." असं वक्तव्य केलं.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Indian MLAs crime record : सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले आमदार कोणत्या राज्यात; महाराष्ट्राचा नंबर कितवा?

तसंच यावेळी त्यांनी, या सभागृहात कितीतरी वाघ बसले आहेत, असं मिश्किल वक्तव्य देखील केलं. ते म्हणाले, इथे (सभागृहात) आपण कितीतरी वाघ बसलो आहोत. आता याच आपल्या वाघांनी एकत्र येऊन या वाघांना वाचण्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे. ज्या प्रकारे आसाममध्ये गेंड्याच्या तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करण्यात आला आहे.

दिसता क्षणी तस्करी करणाऱ्यांना गोळ्या घालण्याचा कायदा करण्यात आला आहे. त्यासारखा कायदा महाराष्ट्रात देखील करावा लागेल. कारण राज्यात वाघाची (Tiger) तस्करी आणि शिकार करणाऱ्यांची टोळी कार्यरत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Devendra Fadnavis News : गोरे प्रकरणात फडणवीसांनी विधानसभेतच शरद पवारांच्या पक्षातील 3 बड्या नेत्यांची नावे केली उघड... 

तर यावेळी टिपेश्वर अभयारण्यातील पीसी वाघिणीची तस्करी झाल्याचा दाखला देत राज्यात अशा प्रकारचा कायदा करता येईल का? याबाबतचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल असं उत्तर वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी दिलं. त्यामुळे आता राज्य सरकार वाघांची तस्करी आणि शिकार रोखण्यासाठी ठोस पावलं उचलणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com