Mumbai News, 10 Sep : ठाकरे गटाच्या सोशल मिडिया राज्य समन्वयक आणि फायरब्रँड नेत्या अशी ओळख असणाऱ्या अयौध्या पौळ (Ayudhya Paul) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतलं.
यावेळी गणपतीची आरती करताना त्यांच्या हातात आरतीचं ताट दिल्याचा व्हिडिओ शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी पौळ यांच्यावर निशाणा साधला आहे.
"अयोध्याताईंच्या हाती आरतीची थाळी देऊन त्यांच्यावतीने आम्हीच बाप्पाला प्रार्थना केली, देवा गणराया या भाचीबाईंना सुबुद्धी दे रे महाराजा!" असं आपल्या ट्विटमध्ये म्हात्रे यांनी लिहिलं आहे. अयौध्या पौळ या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात शिवाय त्या आपल्या अकाऊंटवरून सतत शिवसेना (Shivsena) शिंदे गटावर टीका करत असतात.
हाच धागा पकडत शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये वर्षा निवास्थानी आलेल्या पोळ यांना आरतीचा मान दिल्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे समर्थक विरोधक असा भेदभाव करत नसल्याचा उल्लेख देखील केला आहे.
म्हात्रे यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "मा. मुख्यमंत्री (Eknath Shinde) साहेबांना प्रेमाने ''एकनाथमामा'' म्हणून संबोधणारी लाडकी भाची अयोध्या पौळ नुकतीच वर्षा निवासस्थानी येऊन गेली. अयोध्याताईंचे या सरकारबद्दलचे प्रेम आणि आपुलकी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरुन सगळ्यांनाच दिसत असते.
त्यांच्या याच प्रेमाचा आदर करत मा. साहेबांनी त्यांना घरच्या गणपतीची आरती करण्याचा मान दिला. बाप्पासमोर समर्थक, विरोधक असा भेद नाहीच. मा. मुख्यमंत्री साहेबांच्या मनातही तो नसतोच. त्यामुळेच अयोध्याताईंच्या हाती आरतीची थाळी देऊन त्यांच्यावतीने आम्हीच बाप्पाला प्रार्थना केली, देवा गणराया या भाचीबाईंना सुबुद्धी दे रे महाराजा!" अशा शब्दात त्यांनी पौळ यांना टोला लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.