शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? 'या' दिवशी होणार फैसला

ठाकरे गट व शिंदे गटाकडून आमदार अपात्रता आणि शिवसेनेवरुन दावे-प्रतिदावे
Uddhav Thackeray-Cm Eknath Shinde News
Uddhav Thackeray-Cm Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

शिवसेनेतील बंडखोरी उफाळल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जून महिन्यात मोठा भूकंप झाला होता. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आले. यानंतर शिंदे गटाने संख्याबळाच्या जोरावर खरी शिवसेना आमचीच म्हणत शिवसेना या नावासह धनुष्यबाण चिन्हावर देखील दावा ठोकला आहे. आता यावर मंगळवारी (दि.29) रोजी सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी रद्द करण्यात आली.

आता याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगासमोर येत्या 12 डिसेंबरला होणार आहे. या सुनावणीकडे ठाकरे गट आणि शिंदे गटासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.

Uddhav Thackeray-Cm Eknath Shinde News
Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात 'नो एट्री'

राज्यातील सत्ता संघर्षावर आणि शिवसेना कुणाची यावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाकडे आज सुनावणी पार पडणार होती. मात्र, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी उपलब्ध नसल्याने सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. आता यावर येत्या 12 डिसेंबरला निवडणूक आयोगासमोर होणार आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही बाजूने न्यायालयात युक्तिवाद करण्यात येणार आहे. यादिवशी शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची असा यांचा फैसला होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray-Cm Eknath Shinde News
'' अडीच वर्षात तुम्ही किती चोरी केली ?'' नारायण राणेंचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले होते. त्यांनी भाजपसह राज्यात सत्तास्थापन देखील केली. यानंतर शिंदे गटाकडून वारंवार खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा ठोकण्यात येत आहे. यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती.

उध्दव ठाकरे गट व शिंदे गटाकडून आमदार अपात्रता आणि शिवसेना पक्षावरुन वारंवार दावे प्रतिदावे कऱण्यात येत आहेत. हा पक्षांतर्गत वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला आहे.

दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीच्या अगोदर आयोगाकडून शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले. त्यानंतर ठाकरे गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले. तसेच ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिले आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना शिवसेना पक्षावर दावा सांगण्याकरिता पुरावे म्हणून सर्व कागदपत्रे सादर करण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली होती. २३ नोव्हेंबरला ही मुदत संपली. दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे महत्त्वाचे पुरावे सादरही करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com