Sushma Andhare On Devendra Fadnavis: फडणवीसांची राजीनाम्याची इच्छा अन् अंधारेंनी डिवचलं; म्हणाल्या, "इथून पुढे ते कधीच..."

Sushma Andhare On Devendra Fadnavis: "चंद्रशेखर बावनकुळे यांनासुद्धा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच्या नकारात्मक वातावरणाचा फटका भाजपला बसला आहे."
Devendra Fadnavis, Sushma Andhare
Devendra Fadnavis, Sushma AndhareSarkarnama

Sushma Andhare On Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, माझी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा असून मला पक्षाने सराकारमधून मोकळं करावं, असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. फडणवीसांच्या याच वक्तव्यार प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीस इथून पुढे कधीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनणार नसल्याचं म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर देशासह राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर महाराष्ट्रातील भाजपची पिछाडी आता राज्यातील भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली. शिवाय पक्षाचं काम करण्यासाठी मला सरकारमधून मोकळं करावं, तसंच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायची इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली. (Devendra Fadnavis Resignation)

देवेंद्र फडणवीसांच्या याच वक्तव्यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी फडणवीसांनी पक्षाने कारवाई करण्याआधीच 'डिग्निफाइड एक्झिट' मागितली असल्याचं म्हटलं. अंधारे म्हणाल्या, फडणवीस साहेबांचं हे वक्तव्य म्हणजे 'डिग्निफाइड एक्झिट' मागणं आहे. कारण चंद्रशेखर बावनकुळे यांनासुद्धा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो.

Devendra Fadnavis, Sushma Andhare
Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीसांनी सांगितली राज्यातील महायुतीच्या पराभवाची कारणे

लोकसभा निवडणुकांनंतर भाजप पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचलेली गोष्ट अशी आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच्या नकारात्मक वातावरणाचा फटका भाजपला बसला आहे. त्यामुळे भाजपमधील पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्याआधीच फडणवीस सन्मानपूर्वक बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत," असं अंधारे म्हणाल्या.

फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनू शकत नाहीत

तसंच देवेंद्र फडणवीसांना आता कुठल्याच विधानसभेला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून समोर आणलं जाणार नाही. त्यांना भाजप ख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवू शकत नाही. एकवेळ विनोद तावडेंच नाव समोर येईल, असंही अंधारे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com