Sanjay Raut : एकनाथ शिंदे शून्यात अन् गुंगीत; शिवसेनेतील 25 आमदारांवर फडणवीसांचे नियंत्रण; संजय राऊत यांचा दावा

ShivSenaUBT Party Sanjay Raut CM Devendra Fadnavis DCM Eknath Shinde ShivSena Mumbai : खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नियंत्रण असल्याचा दावा केला आहे.
Sanjay Raut 1
Sanjay Raut 1
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अस्वस्थतेवर प्रहार केला.

"भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिंदे यांच्याकडील 20 ते 25 आमदरांच्या गटावर नियंत्रण आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाचा शब्द देऊन देखील तो पाळला नसल्याने शिंदे शून्यात अन् गुंगीत आहेत", असा टोला खासदार संजय राऊत यांनी केला.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महायुतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अस्वस्थ असल्याचा दावा केला. मुख्यमंत्रीपदाचा शब्द देऊन तो भाजप आणि अमित शाह यांनी पाळला नाही. या धक्क्यातून शिंदे अजून सावरले नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Sanjay Raut 1
Beed Crime : बीडमध्ये मोठी कारवाई; शस्त्र परवाना रद्दचा आकडा 183 वर पोचला, अजून कारवाईचे संकेत

संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्रातील सरकार बहुमतात असले, तरी ते एकसंघ नाही. एकवाक्यता नाही. एकमेकांविरुद्ध कुरघोड्या सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांची कुरघोडीची ताकद, भाजपने (BJP) पूर्णपणे संपवली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा भाजपसमोर सरपटणारा प्राणी झाल्याचे दिसते". एकनाथ शिंदे यांचे खासगीत सांगतात की, विधानसभा निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री राहील, अशाप्रकारचे वचन दिले, म्हणून मी फुटलो. मला विधानसभा 2024 नंतर सुद्धा आपण मुख्यमंत्री राहणार आहात, हे सांगितल्यामुळे मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परंतु निवडणुकीनंतर त्यांना खड्यासारखं बाजूला केलं, असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.

Sanjay Raut 1
Budget 2025 Session LIVE : मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र!

'एकनाथ शिंदे यांचा चेहरा पाहिला असेल, देहबोली पाहिली असेल, ती पहिल्यावर कळेल की, ते शून्यात आहेत, गुंगीत आहेत, ते धक्क्यातून सावरलेले नाही. 50 ते 55 जागा कशा मिळाल्या हा पहिला धक्का, भाजपने अमित शाहने दिलेला शब्द पाळला नाही हा दुसरा धक्का. त्या धक्त्यातून पूर्ण कोलमडलेले आहे. सरकारमध्ये पूर्ण कोंडी झाली आहे. सरकारमध्ये चार-दहा लोकांना मंत्रीपद असणे म्हणजे मान अन् प्रतिष्ठा नाही. जो फोकस मुख्यमंत्री म्हणून होता, तो राहिला नाही. लोक त्यांच्याकडे जात नाहीत. लोक त्यांच्याकडे जातात, फक्त पैसे मागण्यासाठी जातात. यापुढे त्यांचे राजकारण पैसा अन् सत्ता यावरच चालेल', असेही संजय राऊत यांनी म्हटले.

शिंदेंच्या 25 आमदारांवर फडणवीसांचे नियंत्रण

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. त्यांच्यातील एका मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचे पूर्णपणे नियंत्रण आहे. किमान 20 ते 25 आमदारांचा गट आहे. हे लोकं आहेत, ते देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले आहेत. एकनाथ शिंदेंसाठी गेले नाहीत. आजही कंट्रोल फडणवीसांचेच आहे. उरलेले आहेत, चलबिचल आहे. चंचल आहेत. भविष्यात अधिक कोंडी होईल. आपल्याला नेतृत्व नाही. संरक्षण देईल. त्यामुळे पुन्हा मागे फिरायचे का? असा विचार सुरू असल्याची माहिती मिळते असा दावा संजय राऊत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com