Uddhav Thackeray : 'मोदी-मोदी करून शाह यांना स्वर्ग मिळेल का?' ठाकरेंनी भाजप अन् संघाला घेरलं

ShivSena chief Uddhav Thackeray BJP RSS Mumbai Union Minister Amit Shah Babasaheb Ambedkar : भाजप नेते अमित शाह यांन संसदेत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच संतापले.
Uddhav Thackeray 4
Uddhav Thackeray 4Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संसदेत भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि 'आरएसएस'वर संताप व्यक्त केला आहे.

"भाजपच्या हृदयातील काळं बाहेर आलं आहे, देशानं अन् महाराष्ट्रानं शहाणं व्हावं. मोदी-मोदी करून अमित शाह यांना स्वर्ग मिळणार आहे का?", असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी संसदेत संविधानावर भाषण करताना, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विधान केले. 'आंबेडकर-आंबेडकर करण्याची फॅशन आली आहे. त्यापेक्षा देवाचे नाव घेतले असते, तर स्वर्ग मिळाला असता', असे विधान अमित शाह यांनी केले.

Uddhav Thackeray 4
Eknath Shinde : 'याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट'; DCM शिंदेंची ठाकरे-फडणवीस भेटीवर टोलेबाजी

अमित शाह यांच्या या विधानावर लोकसभेत चांगलाच गदारोळ झाला. संसदेतील विरोधकांनी भाजपच्या मनुस्मृती वृत्तीचा निषेध केला. याचे पडसाद संपूर्ण देशात उमटू लागले आहे. लोकसभा, राज्यसभा आणि महाराष्ट्रातील विधानपरिषदेत देखील अमित शाह यांच्या विधानावरून गदारोळ झाला आहे. यावर शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि 'आरएसएस'ला प्रश्न करत घेरलं आहे.

Uddhav Thackeray 4
Chhagan Bhujbal : 'पुन्हा लढू, हा लढा मंत्रिपदाचा नाही, तर अस्मितेचा...'; छगन भुजबळांचा सूचक इशारा

उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपच्या हृदयातील काळं बाहेर आलं आहे. आता तरी देश आणि महाराष्ट्रातील लोकांना सावध झालं पाहिजे. लोकसभा निवडणुकीत आम्ही बोलत होतो की, यांना संविधान बदलायचे आहे. आंबेडकर यांचा शाह यांनी उर्मटपणे उल्लेख केला आहे. आंबेडकरांवर बोलण्या इतकी यांची हिंमत कशी झाली". आता यावर आरपीआयचे रामदास आठवले काय भूमिका घेणार, राजीनामा देणार का? भाजपसोबत गेलेल्यांना ही भूमिका मान्य आहे का?, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

"अमित शाह यांच्या उर्मटपणामुळे भाजपचा बुरखा पूर्णपणे फाटला आहे. भाजपातील उर्मट नेत्यांकडून वारंवार महापुरूषांचा अपमान होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालवण इथल्या पुतळ्यात देखील यांनी भ्रष्टाचार केला. आंबेडकर म्हणणं फॅशन आहे का? अमित शाह यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता सोडावी. महाराष्ट्राच्या दैवतांचा सतत अपमान होत आहे. भाजपच्या नेत्यांना जनतेने विचारावे की हा अपमान मान्य आहे का? भाजप आंबेडकरांचे नाव पुसायला निघालेत", असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com