Sanjay Raut : पवारसाहेबांचे खासदार फोडा अन् मंत्रिपद मिळवा; केंद्रातील भाजपची अजित पवारांना ऑफर, राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut Exposes BJP Strategy : केंद्रातील भाजप मोदी सरकारने महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार फोडून केंद्रात मंत्रिपद मिळवा, अशी ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला.
Sanjay Raut | Sharad Pawar | Ajit Pawar
Sanjay Raut | Sharad Pawar | Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या नेत्यांना केंद्रातील भाजप मोदी सरकारने मोठी ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला.

केंद्रात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच खासदार आहे. केंद्रात खासदार वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पाच ते सहा खासदार फोडा आणि केंद्रात मंत्रिपद मिळावा, अशी आपल्याकडे माहिती आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी मुंबईत सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी केंद्र सरकारने 'वन नेशन, वन इलेक्शन', या विधेयकावर मत मांडले. तसेच केंद्रातील भाजप (BJP) मोदी सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद हवे असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पाच ते सहा खासदार फोडावे. त्यानंतर केंद्रात तुमचा कोटा पूर्ण होईल आणि नंतर मंत्रिपद मिळेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut | Sharad Pawar | Ajit Pawar
Shivsena Politics : शिवसेनेला मंत्रिपद मिळणार 10 ते 12? दावेदार 20 ते 22; एकनाथ शिंदे विधानपरिषदेचे सभापतीपद खेचून घेणार

'शरद पवारसाहेबांनी (Sharad Pawar) कष्टाने निवडून आणलेले खासदार आताही लोक फोडत आहेत. फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे. मी जे हे पाप केलं असतं, तर माझ्यामध्ये हिम्मत नसती बाळासाहेब, उद्धव ठाकरे यांच्या नजरेला नजर मिळविण्याची. मला वाटत की, पवारसाहेबांचा एकही खासदार नोटरीचेबल नाही. त्यांचे सर्व खासदार त्यांच्याबरोबर बंगल्यावर होते. जे कोणी असा विचार करत असतील, तर ते पवारसाहेबांशी बेईमानी करत नाहीत, तर महाराष्ट्राची बेईमानी करतील. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न असेल आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न असेल ही दुधारी तलवार आहे', असेही राऊत यांनी म्हटले.

Sanjay Raut | Sharad Pawar | Ajit Pawar
DCM Eknath Shinde : फडणवीस अन् अजितदादा दिल्लीत बिझी तर एकनाथ शिंदे पुढील 'मिशन'च्या तयारीलाही लागले!

मुंबई महापालिकेची निवडणुका स्वतंत्र लढणार?

आत्तापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, या युती किंवा आघाडीमध्ये लढलेल्या नाहीत, आणि करूच नये, असे म्हणत संजय राऊत यांनी मुंबई आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. मुंबईत मराठी माणूस राहावा, मुंबई मराठी माणसाची राजधानी राहावी, यासाठी आम्ही प्राणाची बाजी लावून लढणार आहोत, असे सांगताच आम्ही कोणताही निर्णय घेताना तीन पक्ष एकत्र बसून घेतो. आम्ही जो निर्णय घेऊ तो निर्णय घेताना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस तीन पक्ष एकत्र बसून घेऊ, असेही राऊत यांनी सांगितले.

मोदी प्रधानमंत्री राहतील का?

वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर बोलताना, या देशात लोकशाही, स्वातंत्र्य पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याच्या योजना आहेत. त्यामध्ये वन इलेक्शन वन नेशन त्यांची संकल्पना आहे. या राज्यामध्ये फेडरल स्टेट सिस्टिम प्रत्येक राज्याची सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी ती वेगळी असते. फक्त तुमची व्यवस्था तुमची सोय तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही, अशा निवडणुका घेत आहात, अशी टीका संजय राऊत यांनी टीका केली.

राज्यातल्या प्रश्न वेगळे, राष्ट्रीय प्रश्न वेगळे, त्यानुसार विचारपूर्वक मतदान करायचं असतं, असे सांगून मुंबई महापालिकेच्या निवडणुका आतापर्यंत घेऊ शकलेला नाहीत, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले. हे बिल कॅबिनेटमध्ये मंजूरही केले आहे. पण 2029 ला वन नेशन वन इलेक्शन हा फंडा असताना नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com