हायकोर्टाचा नवाब मलिकांना दणका : वानखेडेप्रकरणी कारणे दाखवा नोटीस

एनसीबीचे माजी विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी विविध आरोप केले होते.
Nawab Malik News Updates
Nawab Malik News Updatessarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एनसीबीचे माजी विभागीय अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना उच्च न्यायालयाने (High Court) कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

वानखेडे कुटुंबीयांविरोधात बदनामीकारक वक्तव्य न करण्याची हमी उच्च न्यायालयाला देऊनही मलिक वारंवार त्या हमीतून सवलत का घेत आहेत अशा सवाल न्यायालयाने केला होता. जर मंत्री असाप्रकारे सवलत घेत असतील तर न्यायालय ती मागे घेईल, असा इशारा न्यायालयाने दिला होता. त्यानंतर मलिक यांचे वकील रमेश दुबे यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते.

Nawab Malik News Updates
video : तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लावला; नवाब मलिकांचा पलटवार

उच्च न्यायालयाला दिलेल्या हमींचे उल्लंघन केल्याबद्दल अवमानाची कारवाईची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायधीश काथावाला यांनी निर्देश दिले. न्यायालयाने 7 डिसेंबर 2021 रोजी दिलेल्या आदेशानुसार, प्रतिवादी (मलिक) यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, त्यांनी दिलेली उत्तरे न्यायालयात दिलेल्या निवेदनाच्या कक्षेत नाहीत. त्यामुळे कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी. पत्रकार परिषदेतील मजकुराच्या सत्यतेवर प्रतिवादी पक्षाचा आक्षेप असल्यास, त्याने ते रेकॉर्डवर ठेवले असते. याबाबत विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने मलिक यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले, या प्रकरणावर पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला होणार आहे.

ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावनी वेळी मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची हमी न्यायालयाला दिली होती. मात्र, समीर वानखेडे यांच्यावर वक्तव्ये करण्यापासून आपल्याला मनाई करु नये, अशी विनंती मलिक यांनी केली होती.

Nawab Malik News Updates
शरदरावांकडून तरी शिका! पंतप्रधान मोदींकडून पवारांचं कौतुक

मलिक यांनी न्यायालयाला दिलेल्या हमीचा भंग करत आक्षेपार्ह विधाने केल्याचे ज्ञानदेव वानखेडे यांनी अवमान याचिकेत म्हटले होते. मलिक यांनी वानखेडे यांच्या ताप प्रमाणपत्र तसेच क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन विविध आरोप केले होते. त्यामुळे न्यायालयाने मलिक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com