Jitendra Awhad News : "हिंदू देवतांवर बोलण्यापेक्षा आव्हाडांनी मुंब्र्यात अफजल खानवर प्रवचनं द्यावी.."

Shrikant Shinde On Jitendra Awhad News : हिंदू देव-देवतांच्या विरोधात वक्तव्य होत असेल, तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे
Jiotendra Awhad
Jiotendra Awhad Sarkarnama
Published on
Updated on

भाग्यश्री प्रधान -

Thane News : "जितेंद्र आव्हाड नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांनी आमच्या देव-देवतांवर बोलण्यापेक्षा अफजल खान , औरंगजेब यांच्याबद्दल मुंब्रा येथे जाऊन प्रवचन करावे, असा सल्ला खासदार श्रीकांत शिंदे यांनी आव्हाड यांना दिला आहे. यासंदर्भात आव्हाड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे डीप क्लीन या मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी पार पडला. यावेळी खासदार शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार गणपत गायकवाड उपस्थित होते. (Latest Marathi News)

Jiotendra Awhad
Ncp News : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर; नवे वेळापत्रक जाहीर करणार

आव्हाड यांना सल्ला -

आमदार जितेंद्र आव्हाड यांना वादग्रस्त वक्तव्य करणे नेहमीच आवडते. अशांतता पासरवण्यामध्येच त्यांनी पी.एच.डी केली आहे. हिंदू देव देवतांवर भाष्य केल्याने मुंब्रा येथील मतदार खुश होतील, असे त्यांना वाटते. त्यामुळे मुंब्रा येथे जाऊनच त्यांनी अफजल खान , औरंगजेब यांच्यावर प्रवचने द्यावी, असा सल्ला खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिला. इतकेच नव्हे तर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण सुरू आहे. हिंदू देव-देवतांच्या विरोधात वक्तव्य होत असेल, तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Jiotendra Awhad
Pandharpur Assembly Election : प्रशांत परिचारक वाढविणार भाजपचे टेन्शन; विधानसभेसाठी पुन्हा दंड थोपटले...

डीप क्लीन मोहिमेबाबत माहिती -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने या डीप क्लीन मोहिमेची मुंबई येथून सुरुवात झाली. ही मोहीम राज्य सरकारकडून राबविण्यात येत आहे. आज त्याचा कल्याण महापालिकेतर्फे शुभारंभ करण्यात आला असून बाहेरून देखील कामगार मागवण्यात आले आहेत.

पारंपारिक पद्धतीने शहर स्वच्छ करण्यासोबतच आजूबाजूला जमलेली धूळ स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्यामुळे मशीनने ही धूळ स्वच्छ केल्याने शहरातील कोपरे देखील स्वच्छ होणार आहेत. सर्वच महापालिका ही मोहीम राबविणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com