Shrikant Shinde News : 'ज्यांनी भगवा रंग सोडला अन्.. ; होळीच्या शुभेच्छा देतानाही श्रीकांत शिंदेंनी सोडली नाही टोमणा मारण्याची संधी!

Shrikant Shinde Celebration : जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत?, ठाण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत खेळली होळी
Shrikant Shinde
Shrikant ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane Political News : एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकारणविरहित होळी साजरी करू या.. असे भाष्य करत राजकीय वक्तव्य प्रामुख्याने टाळले आहे. दुसरीकडे मात्र त्यांचे सुपुत्र तथा कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी 'ज्यांनी ज्यांनी भगवा रंग सोडला आणि जो रंग धारण केला आहे, त्यांना त्याचा रंग लखलाभ होवो, असे विधान करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, त्यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले आहे.

होळी सणानिमित्त खासदार शिंदे(Shrikant Shinde) यांनी कल्याण येथे रवाना होण्यापूर्वी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील टिप्पणी केली. तसेच त्यांनी या वेळी सर्वांना शुभेच्छा देत, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत रंगाची उधळण करण्यास ते विसरले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shrikant Shinde
Raj Thackeray MNS : एकनाथ शिंदेंचा पत्ता कट, राज ठाकरे होणार शिवसेनेचे प्रमुख; काय आहे भाजपचा प्रस्ताव?

याचदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना, त्यांनी आज वेगवेगळ्या रंगात सगळेच रंगलेले असतील. तसेच भारत एकाच रंगात रंगला आहे. तो रंग म्हणजे भगवा आपणही आज भगव्या रंगात रंगलो आहोत. पण, ज्यांनी ज्यांनी भगवा रंग सोडला आणि जो रंग धारण केला आहे, त्यांना त्यांचा रंग लखलाभ हो, अशीही टिप्पणी केली.

याचबरोबर या वेळी श्रीकांत शिंदे यांनी, 'आम्ही भगवा रंग सोडला नाही. बाळासाहेबांचा भगवा रंग, हिंदुत्वाचा आणि प्रभू रामाचा भगवा रंग पुढे घेऊन जाण्याचे काम आम्ही करत आहोत, असेही सांगितले. तसेच, ठाण्यातून पुढे कल्याण लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह स्थानिक लोकांना भेटून होळीचा सण साजरा करणार आहोत, अशी माहिती दिली.

Shrikant Shinde
Solapur Politics : मोठी घडामोड! तिकीट कापल्यानंतर सिद्धेश्वर स्वामी 'सागर' बंगल्यावर; फडणवीसांसोबत महत्त्वाची बैठक

तसेच, टेंभीनाक्यावर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या सणांपैकी होळी हा एक सण आहे. तोही आज मोठ्या आनंदात साजरा होणार आहे. तसेच तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे स्वतः जाणार आहेत, असेही खासदारांनी या वेळी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.