Uddhav Thackeray : मुंबई : शिवसेनेत (Shivsena) मोठी फुट पडली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक गट तयार झाला आहे. आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जमेल त्या पद्धतीने शिवसेनेवरील आपली निष्ठा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. यासाठी विविध फंडे वापरण्यात येत आहेत. शिवसैनिकांनी निष्ठापत्र भरुन पाठविली आहेत. मात्र, धुळ्यातील एका एसटी कामगाराने थेट स्वतःच्या रक्तानेच निष्ठापत्र लिहुन ठाकरे यांना पाठविले आहे.
धुळे एसटी महामंडळात वाहक असलेले व एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष मनोज गवळी यांनी रक्ताने ठाकरे यांना पत्र पाठवित पक्षावरील निष्ठा व्यक्त केली आहे. त्यानंतर ठाकरे यांनी तत्परतेने या पत्राची दखल घेतली. जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्याशी संपर्क साधत मनोज गवळी यांना भेटीसाठी थेट 'मातोश्री'वरच बोलावले.
गवळी यांनी 'मातोश्री'वर गेल्यानंतर ठाकरे यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच पक्षावर दाखविलेल्या निष्ठेबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी गवळी यांच्या समवेत एसटी कामगार सेनेचे आय. एन. मिर्झा उपस्थित होते. 'मातोश्री'वरुन मिळालेल्या प्रतिसादाबद्दल भारावुन गेलो, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
शिवसेनेवरील दाव्याचा खटला निवडणूक आयोगात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सदस्यनोंदणी व शपथपत्रांची मागणी शिवसैनिकांकडे केली होती. मला वाढदिवसाला पुष्पगुच्छ नको. सदस्यनोंदणी व शपथपत्रांचे गठ्ठे हवे आहे, असे त्यांनी सांगितले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.