सोमय्या हल्ला प्रकरण: संजय पांडेचे CISFच्या महासंचालकांना पत्र

Kirit Somaiya| Sanjay Pandey| 23 एप्रिलला राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनमध्ये गेले होते.
Sanjay Pandey, Kirit Somaiya
Sanjay Pandey, Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी CISFच्या महासंचालकांना पत्र पाठवलं आहे. किरीट सोमय्यांवर हल्ला झाला त्यावेळी सीआयएसएफ सेक्युरीटी काय करत होती याची चौकशी करा, अशी सूचना संजय पांडे यांनी सीआयएसएफच्या महासंचालकांना दिली आहे.

Sanjay Pandey, Kirit Somaiya
धुळे महापालिकेच्या अनधिकृत मालकांना सळो की पळो करू!

सीआयएसएफने मुंबई पोलिसांना जाब विचारल्यानंतर आता मुंबई पोलिसांनीही जशास तसं उत्तर दिलं आहे. सोमय्यांना केंद्रसरकारची झेड सिक्युरिटी आहे. मग त्यांच्यावर हल्ला होत असताना सीआयएसएफचे जवान कुठे होते, याची चौकशी करा, अशा आशयाचं पत्र संजय पांडे यांनी लिहिलं आहे. या पत्रामुळे आता केंद्र विरुद्ध मुंबई पोलीस असं चित्र निर्माण झाल्याचं दिसत आहे. आता संजय पांडे यांच्या पत्राला सीआयएसएफचे महासंचालक काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

23 एप्रिलला राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. किरीट सोमय्या आल्याचं समजल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत किरीट सोमय्यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या. यामध्ये किरीट सोमय्यांच्या गाडीची काच फुटली आणि किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाले. मात्र झेड सुरक्षा असणाऱ्या व्यक्तीवर दोन वेळा कसा हल्ला होतो, असा जाब सीआयएसएफने मुंबई पोलिसांना विचारला होता. त्याला मुंबई पोलिसांनी उत्तर दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com