Corona Testing Lab
Corona Testing Labsarkarnama

मुंबई हादरली ; आफ्रिकन देशातून मुंबईतील आलेले आणखी चार जण पॅाझिटिव्ह

आफ्रिकेसह अन्य जोखमीच्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांचा शोध पालिकेने सुरू केला असून यात पहिल्या टप्प्यामध्ये 12 नोव्हेंबरपासून आफ्रिकेतून 466 प्रवासी मुंबईत दाखल झाले होते.

मुंबई : आफ्रिकेसह अन्य जोखमीच्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांचा शोध मुंबई महापालिकेने सुरू केला आहे. ओमीक्रोनचा (Omicron) संसर्ग वाढलेल्या देशातून (African Countries) आलेले ४ नागरिकाचा कोरोनाचा अहवाल हा पॅाझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे ओमीक्रोनचा संसर्ग असलेल्या देशातून आलेले पाच जण कोरोना पाँझिटिव्ह आढळले आहेत.

त्याच बरोबर दक्षिण आफ्रिकेतील एक ३६ वर्षीय महिला कोरोना पाँझिटिव्ह आढळली आहे. तिला सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. अन्य चार जणांवर सेव्हन हिल्स रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. या पाच पाँझिटिव्ह रुग्णांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यासाठी पुण्यात पाठवण्यात आले आहेत.

या कोविड पाँझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा सध्या मुंबई महापालिकेकडून शोध सुरू आहे. आफ्रिकेसह अन्य जोखमीच्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांचा शोध पालिकेने सुरू केला असून यात पहिल्या टप्प्यामध्ये 12 नोव्हेंबरपासून आफ्रिकेतून 466 प्रवासी मुंबईत दाखल झाले होते. 15 दिवसांपूर्वी मुंबईत 466 जण आलेत. पैकी 100 जण हे मुंबईतील आहेत. ह्या सर्वांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. याच चाचणीत डोंबिवलीतल्या रुग्णाचा शोध लागला. संबंधीत रुग्ण हा 40 वर्षांचा आहे आणि तो दक्षिण आफ्रिकेचाच रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Corona Testing Lab
साहित्य संमेलन १४४ वर्षांपासून घालमोड्या दादांचेच ; उद्धघाटनापूर्वी सूप वाजले!

अहवाल अद्याप आलेला नाही.

डोंबिवली पाठोपाठ मुंबईलाही हादरले बसले. त्या संबंधीत प्रवाशाची चाचणी झाली. त्याच्या कुटुंबियाचीही झाली. त्यात तो प्रवाशी पॉझिटिव्ह आला. त्याचे कुटुंबीय मात्र निगेटीव्ह निघाले. पण त्याच दक्षिण आफ्रिकेतून महाराष्ट्रात आलेले इतर पाच जण मात्र पॉझिटिव्ह निघालेत. त्यात मुंबई, पुणे, भाईंदरमधल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे तर पिंपरीच्या दोघा जणांचा समावेश आहे.

या सहा जणांना ओमिक्रॉनची लागण झालीय का नाही त्याच्या तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आलेत. जिनोम सिक्वेन्सिंगही करण्यात आली आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. महाराष्ट्रात दक्षिण आफ्रिका कनेक्शन असणारा कोरोनाबाधित असलेला पहिला व्यक्ती हा डोंबिवलीत (Dombivali Corona case) आढळला.

दुसऱ्या लाटेतील डेल्टापेक्षाही अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच केंद्र सरकारने राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. ओमीक्रॉन हा कोरोनाचाच नवा प्रकार आहे आणि तो डेल्टापेक्षा जास्त घातक आहे. कोरोना आटोक्यात आला असे वाटत असतांनाच आता आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com