एसटी संपाचा तिढा सुटणार; राज्य सरकारची उच्चस्तरीय समिती काढणार तोडगा

एसटी महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा मागील चार महिन्यांपासून कायम आहे.
MSRTC News | ST Employees strike News updates
MSRTC News | ST Employees strike News updatesSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एसटी महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा मागील चार महिन्यांपासून कायम आहे. आता हा तिढा सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या सभापतींनी याबाबत राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. या समितीत मंत्री, विरोधी पक्षनेते आणि सभागृहातील सदस्यांचा समावेश असणार आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना एसटी संपाबाबत (ST Strike) समिती नेमण्याची सूचना केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचारी महामंडळाच्या विलीनीकरणावर ठाम आहेत. राज्य सरकारने मात्र, विलिनीकरणाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. आता या संपावर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. यामुळे या संपावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, एसटीचं एक गोपनीय पत्र व्हायरल झाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या पत्रामध्ये कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून घेत त्यांच्यावर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनीही यावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पडळकर यांनी माध्यमांसमोरच हे पत्र वाचून दाखवले.

MSRTC News | ST Employees strike News updates
मी पाटील, पाठीमागून वार करीत नाही! बंटी पाटील अन् आवाडेंच्यात जुंपली

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) आदेशानुसार नेमण्यात आलेल्या समितीने विलीनीकरण न करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा (ST Employees) संप अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत उच्च न्यायालयात 11 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच एसटीचे महाव्यवस्थापक माधव काळे यांच्या सहीचे एक गोपनीय पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. (ST Employees Strike)

MSRTC News | ST Employees strike News updates
नितीन गडकरींच्या नागपुरातच पेट्रोल, डिझेलपेक्षा सीएनजी महाग!

पत्रामध्ये कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 'आपल्या विभाग, आगारातील बेकायदेशी संपात असणारे जास्तीत जास्त कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्यावर तसेच संपूर्ण राज्यातील रा. प. वाहतूक सुरळीत सुरू झाल्यावर दि. 29.10.2021 ते दि. 10.03.2022 पर्यंत जे कर्मचारी बेकायदेशीर संपात सहभागी होते त्या सर्व कर्मचाऱ्यांवर पुढे शिस्त व आवेदन कार्यपध्दतीनुसार प्रमादीय कार्यवाही करण्यात आली. या सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,' असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com