Maharashtra Politics : 'धनुष्यबाण' हाती घेण्यासाठी निघालेल्या मोठ्या नेत्याचा एकनाथ शिंदेंना 'चकवा'; भाजप आमदाराच्या 'गुगली'ने डाव फसला!

Subhash Pawar Kisan Kathore BJP Shivsea : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर अससेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शिवसेनेला चकवा देत भाजपचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Eknath Shinde Subhash Pawar Kisan Kathore
Eknath Shinde Subhash Pawar Kisan Kathoresarkarnama
Published on
Updated on

Subhash Pawar News : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकी पक्ष सोडलेले नेते पुन्हा स्वगृही परत आहेत. त्यात शिवसेनेला सोडचिठ्ठीत देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पुन्हा शिवसेनेत येणार असल्याची चर्चा होती. ते शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख होते.

पवार हे शिवसेनेत जाणार हे निश्चित मानले जात असताना भाजप आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेला धक्का देत त्यांना भाजपकडे वळवले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाटेवर असणारे पवार लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

सुभाष पवार हे विधानसभा निवडणुच्या वेळी मुरबाड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून किसन कथोरे यांच्या विरोधात लढले होते. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे ते पुन्हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र, आपल्या विरोधात लढलेल्या सुभाष पवार यांना भाजपकडे वळवण्यात आमदार कथोरे यांना यश आले.

कथोरे म्हणाले, ‘काही हौशे-गवशे विधानसभा निवडणुकीत माझ्याविरुद्ध विरोधी उमेदवारांना साथ देत होते. परंतु आता तेच भाजपाच्या विकास मार्गावर येत आहेत. आता राष्ट्रवादीचे सुभाष पवारही येणार आहेत. दरम्यान, महायुतीमध्येच एकमेकांच्या नेत्यांना आपल्या पक्षात खेचण्याचे प्रयत्न होत असल्याने बदलापुरात भाजप-शिवसेना संघर्ष तीव्र होणार आहे.

Eknath Shinde Subhash Pawar Kisan Kathore
Local Body Election 2025 : 'स्थानिक'च्या निवडणुकीत उमेदवारी हवीय, मग ही बातमी वाचाच! असा सुरू आहे मुलाखतींचा 'ट्रेंड'

महेश गायकवाड शिवसेनेतच

खासदार श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू महेश गायकवाड हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. महेश गायकवाड यांच्यावर कल्याणचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. त्यामुळे महेश गायकवाड विरुद्ध गणपत गायकवाड वाद हा विधानसभेपूर्वी महाराष्ट्रभर गाजला होता. मात्र, ते आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांनी त्यांनी कल्याण पूर्व व उल्हासनगर विधानसभा संपर्कप्रमुखपदावर नियुक्ती केल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा तूर्तास थांबल्या आहेत.

Eknath Shinde Subhash Pawar Kisan Kathore
BJP Politics : कांदे की भुजबळ कोणाचा हात धरावा? नांदगावात भाजप पुढे मोठा पेच

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com