Sudhir Mungantiwar: एकीकडे भाजप नेत्यांविरोधात आक्रमक झालेले मुनगंटीवार शिंदेंच्या मदतीला धावले; 'जय गुजरात'चं...

Maharashtra Politics: शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे गृहमंत्र आणि भाजपचे नेते अमित शाह यांच्या उपस्थित एका कार्यक्रमात आपल्या भाषणाच्या शेवटी 'जय गुजरात' म्हटल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे.
Sudhir Mungantiwar- eknath Shinde
Sudhir Mungantiwar- eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे गृहमंत्र आणि भाजपचे नेते अमित शाह यांच्या उपस्थित एका कार्यक्रमात आपल्या भाषणाच्या शेवटी 'जय गुजरात' म्हटल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससह उद्धव आणि राज ठाकरे यांनीही याचा समाचार घेतला आहे. गुजरात मांडलीक झाल्याची टीकाही त्यांच्यावर केली जात आहे. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिंदे यांच्या 'जय गुजरात'चे जोरदार समर्थन केले. हे सांगताना त्यांनी सनी देओलच्या 'गदर' या चित्रपटाच्या डॉयलॉगकडे विरोधकांचे लक्ष वेधले आणि महाराष्ट्राचा कुठे अपमान झाला अशी विचारणा केली.

'गदर' चित्रपटात सनी देओलला पाकिस्तान जिंदाबाद म्हणायला लावले जाते. ते तो म्हणतोसुद्धा. मात्र जेव्हा हिंदुस्थान मुर्दाबाद म्हणायला लावले जाते तेव्हा तो यास नकार देतो. असे सांगून मुनगंटीवार यांनी पाकिस्तान जिंदाबाद म्हटल्याने भारताचा अपमान कसा झाला असाही सवाल केला.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जय गुजरातवरून अकारण राजकारण केले जाते. एवढे संकुचित लोक मी नाही बघितले असा टोलाही त्यांनी काँग्रेस व उद्धव सेना आणि मनसेच्या नेत्यांना लागावला. शिंदे यांच्या जय गुजरातवर राजकारण करण्याचे, वादंग घालण्याचे काहीच कारण आहे. त्यांनी आधी जय महाराष्ट्र म्हटलं आणि नंतर जय गुजरात. आपण राष्ट्रगीत म्हटल्यानंतर भारत माता की जय म्हणतो. या भारतात गुजरातही आहे. त्यामुळे गुजरातचाही जय होतोच ना असेही मुनगंटीवार म्हणाले.

जय गुजरात, जय उत्तरप्रदेश म्हटल्याने आपण छोटे होत नाही. मराठी आणि हिंदी भाषेचा वाद जोरात सुरू आहे. विरोधकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महायुती सरकारने इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीचा शासनादेश मागे घेतला आहे. यानंतरही हा मुद्दा आणखीच तापत चालला आहे.

Sudhir Mungantiwar- eknath Shinde
Devendra Fadnavis: विजयी मेळाव्यानंतर फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार; तर उद्धव यांची 'या' एकाच शब्दात उडवली खिल्ली

आज राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन संयुक्त सभा घेतली. यावर मुनगंटीवार यांनी मुबंई माहपालिकेच्या निवडणुकीसाठी हे राजकारण सुरू असल्याचे सांगितले. मराठी माणसाला इंग्रजी भाषा शिकल्याचा अभिमान वाटतो मात्र आपलीच भारतीय भाषा हिंदीने शिकल्याने त्याचा अवमान कसा होतो हेच मला समजत नाही.

या मुद्द्याचा निवडणुकीत कोणाला किती फायदा होईल हे सांगता येत नाही. मात्र यापेक्षा विरोधकांनी यावरून निर्माण होऊ घातलेले गैरसमज दूर करणे जास्त आवश्यक आहे. पहिलीपासून हिंदी शिकवल्यास ती भाषा सहज शिकता येऊ शकते. त्यात मरठीला डावलले जाण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही. मराठी भाषेवरून कुठलेही राजकारण झालेले नाही. असे असताना हा गैरसमज परसवल्या जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com