Devendra Fadnavis: विजयी मेळाव्यानंतर फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार; तर उद्धव यांची 'या' एकाच शब्दात उडवली खिल्ली

Thackeray Brothers Vijayi Melava : उद्धव ठाकरे म्हणाले, बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख करतो. राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे. आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे.
Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News: मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विजयी मेळाव्यात उद्धव आणि मी 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलो असल्याचं सांगितलं.याचदरम्यान, जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायला, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, अशी खोचक टिप्पणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. याच टीकेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी(ता.5 जुलै)पंढरपूर येथे मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर भाष्य करतानाच राज ठाकरेंच्या टीकेवरही खोचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी राज ठाकरेंचे (Raj Thackeray) आभार मानतो,की त्यांनी दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं.श्रध्देय बाळासाहेबांचे आशीर्वादही मलाच मिळतील असंही त्यांनी म्हटलं.

फडणवीस म्हणाले, मला विजयी मेळावा होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, पण तिथे रुदालीचं भाषणही झालं. आणि मराठीबद्दल एक शब्दही न बोलता आमचं सरकार गेलं. आमचं सरकार पाडलं, आम्हांला सरकारमध्ये द्या, आम्हांलाच निवडून द्या. हा मराठीचा उत्सव नव्हता, तर ही रुदाली होती. या रुदालीचं दर्शन आपण त्याठिकाणी घेतलं आहे.

मुळात हा प्रश्न आहे की, 25 वर्षे महापालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच काम करु शकले नाही. पण आम्ही मोदींजींच्या नेतृत्वात मुंबईचा चेहरामोहरा बदलला.त्यांच्याकाळात मुंबईतील मराठी माणूस हा हद्दपार झाला, पण आम्ही बीडीडी, पत्राचाळ आणि अभ्युदयनगरच्या मराठी माणसांना आम्ही त्याच ठिकाणी मोठं घर दिलं. ही असूया त्यांच्या मनात असल्याचा आरोपही मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यावेळी केला.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
BJP News : खळबळजनक! भाजपच्या बड्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; दबा धरुन बसलेल्या आरोपींनी 'असा' वाजवला 'गेम'

ये पब्लिक है सब जानती है.त्यामुळे मुंबईतला मराठी माणूस की अमराठी सगळेच आमच्यासोबत आहेत.आम्ही मराठी आहोत,आम्हांला मराठी भाषेचा अभिमान आहे,मराठी असल्याचा अभिमान आहे.पण त्याचवेळी आम्ही हिंदू आहोत, आम्हांला हिंदुत्वाचा अभिमान आहे,असंही फडणवीस यांनी ठणकावलं. आणि आमचे हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे हिंदुत्व आहे, असेही फडणवीसांनी सांगितलं.

ते शनिवारी वरळी डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंचे मनोमिलन होताना दिसले. यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केले.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Pune Rape Case : 'कुरिअर बाॅय' बलात्कार प्रकरणात 'तो' फोटो दाखवला अन् गेमच फिरला! तरुणीने पोलिसांना केलेल्या एकाच प्रश्नाने पोलखोल!

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव ठाकरे, अशी केली.यानंतर त्यांनी आपले नेहमीचे माझ्या तमाम मराठी माता बंधू आणि भगिनींनो हे नेहमीचे वाक्य उच्चारले. राज ठाकरे यांनी म्हटले की, आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस सर्व बाजूंनी कसा एकवटतो, हे चित्र त्यांना दिसले असते. पण फक्त मोर्चाच्या घोषणेनेच यांनी माघार घेतली, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

अमित शाह म्हणतात,भविष्यात ज्याला इंग्रजी येईल,त्याला लाज वाटेल. पण त्यांना स्वत:लाच इंग्रजी येत नाही येत. मराठा साम्राज्य अटकेपार पोहोचले होते.मराठ्यांनी सव्वाशे वर्षे आम्ही राज्य केलं,पण आम्ही मराठी लादली का?असा सवाल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात विचारला.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : मालक समोर आला अन् गद्दार 'जय गुजरात' म्हणाला; ठाकरेंनी शिंदेंची पुरती उतरवली

'आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला...'

उद्धव ठाकरे म्हणाले,बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख करतो. राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे. आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. तसेच आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com