Political News : 'गद्दार' शब्दाचा महिमाच अपार;झुंज तिघींची पण राजकीय संकेतांचा उठला बाजार

Shivsena : शिवसेनेचे नेते गद्दार शब्दाचा धसका घेतात. शिवसेना सोडणाऱ्याला गद्दार असे संबोधले जाते. शिवसेना सोडणाऱ्या अनेक दिग्गज नेत्यांचाही मतदारांनी पराभव केला आहे, अनेकांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला आणि शिंदे गटाच्या महिला नेत्या आक्रमकपणे चतुर्वेदी यांच्यावर तुटून पडल्याचे पाहायला मिळाले.
sheetal mhatre priyanka chaturvedi jyoti waghmare
sheetal mhatre priyanka chaturvedi jyoti waghmaresarkarnama

Political News : राजकारणात वाद-प्रतिवाद सुरूच असतात. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून या वाद-प्रतिवादांची तीव्रता वाढली. हे सरकार पडल्यानंतर त्याची तीव्रता आणखी वाढली. त्यातूनच लोकसभा निवडणुकीतही शेरेबाजी होऊ लागली आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) प्रियंका चतुर्वेदी Priyanka Chaturvedi यांनी मुंबईतील एका प्रचारसभेत शिंदे गटाच्या जिव्हारी लागेल अशी टीका केली आणि त्याला उत्तर देताना शिंदे गटाच्या नेत्यांचे भान सुटले.

शिवसेनेतून Shiv Sena फुटून बाहेर पडलेल्यांचा उल्लेख गद्दार असा केला जातो. हे पूर्वापार चालत आले आहे. अशा नेत्यांवर शिवसैनिकांनी एकदा का गद्दार असा शिक्का मारला की मतदारांनी त्यांना धडा शिकवलेला आहे. शिवसेना सोडलेले नारायण राणे, छगन भुजबळ chhagan bhujbal आदी दिग्गज नेत्यांचा मतदारांनी पराभव केला आहे. त्यामुळे 'गद्दार' हा शब्द शिंदे गटाच्या जिव्हारी लागतो. कारण त्याची तीव्रता त्यांना माहीत आहे. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत गेले आणि मुख्यमंत्री झाले. त्यापूर्वी त्यांनी सूरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर उद्धव ठाकरे गटाने गद्दार असा शिक्का मारला. '50 खोके एकदम ओके ' अशी घोषणाही त्या आमदारांच्या मागे कायमची लावण्यात आली. शिंदे गटाच्या काही आमदारांना लोकसभेच्या निवडणुकीतही लोकांकडून या घोषणा ऐकून घ्याव्या लागत आहेत.

sheetal mhatre priyanka chaturvedi jyoti waghmare
Priyanka Chaturvedi : प्रियांका चतुर्वेदींनी मारला पंजा पण घायाळ केले; शीतल म्हात्रे, ज्योती वाघमारेंनी

शिवसेनेत गद्दार शब्द मागे लागला की त्याचे परिणाम काय होतात, याची कल्पना असल्याने शिंदे गटाची ही दुखरी नस बनली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी ही नस प्रचारादरम्यान दाबली. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यासाठी घाटकोपर येथे आयोजित प्रचारसभेत प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांचा उल्लेख गद्दार असा केला. चतुर्वेदी या अशी प्रखर टीका सहसा करत नाहीत. मात्र, निवडणुकीचे वातावरण तापल्याचा हा परिणाम असावा. दीवार या हिंदी चित्रपटातील एक दाखल देत चतुर्वेदी म्हणाल्या, की अमिताभ बच्चन यांच्या हातावर 'मेरा बाप चोर है', असे लिहिलेले असते. त्याप्रमाणेच कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर 'मेरा बाप गद्दार है', असे लिहिले आहे. प्रियंका चतुर्वेदी यांच्या अशा टीकेनंतर शिंदे गटाच्या नेत्यांचे पित्त खवळणे साहजिक होते.

प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर पहिल्यांदा शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी हल्ला चढवला. त्यांनी पातळी सोडून टीका केली. खासदार होण्यासाठी तुम्ही काय केले आहे, हे आम्हाला माहिती आहे. ते सांगायला लावू नका. खासदारकीची टर्म संपल्यामुळे तुमची तडफड सुरू असून पुन्हा खासदार होण्यासाठी तुम्ही काय काय केले, हेही आम्हाला माहीत आहे. तुम्ही आधी खासदार कशा झाल्या होत्या, हेही आम्हाला सांगायला लावू नका, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली.

दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केले, असा प्रश्नही त्यांनी विचारला. शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनीही प्रियंका चतुर्वेदी यांचा पाणउतारा केला. खासदार होण्यासाठी लाचार होत काँग्रेसमधून शिवसेनेच कोण आल्या होत्या, असा प्रश्न त्यांनी विचारला. चतुर्वेदी यांची टीका किती जिव्हारी लागली आहे, याचा अंदाज या दोन्ही महिला नेत्यांनी दिलेल्या प्रत्युत्तरातून येतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या तिघांची झुंज सुरू असताना संजय शिरसाट कसे शांत बसतील? संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते असून, त्यांनी यापूर्वी प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. यावेळी मात्र ते वादग्रस्त बोलले नाहीत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिरसाट यांनी त्या (प्रियंका चतुर्वेदी) कोण आहेत, असा प्रश्न केला. त्या महिलेबाबत आम्ही अपशब्द वापरू शकत नाही. सूर्यावर थुंकताना थुंकी आपल्या तोंडावर येते, हे प्रियंका चतुर्वेदी यांनी लक्षात ठेवावे, असे शिरसाट म्हणाले. शिवसेनेत गद्दार या शब्दाचा महिमा किती अपरंपार आहे, हे या झुंजीवरून दिसून येते.

(Edited By Roshan More)

sheetal mhatre priyanka chaturvedi jyoti waghmare
Chandrashekhar Bawankule : चंद्रकांत पाटलांवर अजितदादा नाराज? चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला 'त्या' वक्तव्याचा अर्थ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com