Pankaja Munde News : मुंडे समर्थकांनी शब्द खरा करून दाखवला...; दोन दिवसांतच कोट्यवधींचा निधी जमा !

Maharashtra Politics : दोन दिवसांतच जवळपास 7 कोटी रुपयांपर्यंतची रक्का गोळा झाल्याचा दावा केला जात आहे.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed Politics : भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला जीएसटी आयुक्तालयाने १९ कोटी रुपयांच्या जीएसटीप्रकरणी नोटीस बजावली आहे. ही नोटीस बजावल्यानंतर मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. सरकारचे 19 कोटी आम्ही लोकवर्गणीतून जमा करू आणि ती थोबाडावर फेकून मारू, अशा इशारा समर्थकांनी दिला होता. तो त्यांनी खरा करून दाखवला आहे. दोन दिवसांतच जवळपास 7 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम गोळा झाल्याचा दावा केला जात आहे.

एक लाख रुपयांपासून ५० लाख रुपयांपर्यंत मदतीचे धनादेश गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावाने लिहून तयार आहेत. फक्त 19 कोटींसाठी आमचे दैवत मुंडे साहेबांचा आत्मा वैद्यनाथ कारखाना बदनाम करत असाल, तर... ती रक्कम तुमच्या थोबाडावर फेकून मारू, अशी गर्जना या समर्थकांनी सोशल मीडियातून केली होती. त्याला आता समर्थकांनी थेट मदतीच्या माध्यमातून पुढाकार घेत आपला शब्द खरा करून दाखवला आहे. त्यामुळे त्यांची राज्यभरात मोठी चर्चा होत आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde News : 19 कोटी थोबाडावर मारू म्हणणारे पंकजाताईंचे समर्थक लागले कामाला; कारखान्यासाठी चेकवर चेक

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी कारखान्यावरील कारवाईबाबत आपली भूमिका मांडली आहे. कारखान्याची आर्थिक अडचण, यामुळे त्यांच्याकडून होत असलेले प्रयत्न आणि कारखान्यावर ही अडचण का आली, याबाबत त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. कारखान्याला मदत व्हावी आणि कारखाना अडचणीतून बाहेर यावा, यासाठी त्यांच्याकडून होत असल्याच्या प्रयत्नांचा परामर्षही त्यांनी घेतला होता.

राज्यातील विविध कारखान्यांना केंद्रीय सहकार विभागाने मदत केली असताना वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) मात्र मदतीच्या यादीतून वगळण्यात आला आहे. याबाबतदेखील पंकजा मुंडे यांनी भाष्य केले होते. त्यानंतर कार्यकर्ते मदतीसाठी सरसावले आहेत. 50 लाख, 11 लाख अशा विविध रकमा असलेल्या चेकचे फोटो व्हायरल होत आहेत, तर गावागावांतही मदत गोळा केली जात आहे. यासाठी अनेक व्हाॅट्सअॅ प ग्रुपही काम करत आहेत.

दरम्यान, आम्ही ऊसतोड मजुरांनी भगवानगड उभा केलाय, भगवान भक्तिगड, गहिनीनाथ गड उभा केला. गोपीनाथगडसुद्धा उभा केलाय...आमच्या दैवतांसाठी आम्ही प्रत्येक गावात कोटी दोन कोटी सहज दान देतो... तुमचा माज जिरवण्यासाठी आम्हाला दोन दिवससुद्धा लागणार नाहीत, असे आव्हानदेखील या समर्थकांनी दिले होते. फक्त आम्ही आदेशाची वाट पाहतोय... तुम्ही सगळ्यांना गृहीत धरून येड्यात काढू शकता, पण आमच्या नादी लागाल...तर तुम्ही परत दुर्बीण लावूनसुद्धा दिसणार नाहीत, असा गर्भित इशाराही दिला होता. आता आगीत हात घातलाचा आहे तर परिणामांनाही तयार राहा, असे आव्हान देणाऱ्या समर्थकांनी मदतीच्या रकमेचे धनादेश गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावे लिहून तयार ठेवले आहेत.

भगवान भक्तीगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात ही रक्कम पंकजा मुंडे यांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. असाच मदतीचा ओघ सुरू राहिला तर पुढील तीन चार दिवसांतच 19 कोटींची रक्कम गोळा होण्याची शक्यता आहे. या माध्यमातूनच दसरा मेळाव्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन पंकजा मुंडे पुन्हा शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Pankaja Munde
IPS Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या शुक्ला होणार पोलिस महासंचालक ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.