Durg Case : पक्ष फोडायचा, उडता महाराष्ट्र करायचा आणि खोक्यांचा वापर करायचा; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर घणाघात

Supriya Sule Slams Devendra Fadnavis : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Supriya Sule, Devendra Fadnavis
Supriya Sule, Devendra Fadnavis Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Politics New : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ड्रग्ज प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांचं मत काय? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Supriya Sule, Devendra Fadnavis
Nashik Drugs Politics : ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित राजकीय ‘बडी भाभी’ कोण?

ससून रुग्णालयातून पळून गेलेला आणि मुंबई पोलिसांनी अटकलेला ड्रग माफिया ललित पाटील याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आपण पळालो नाही तर आपल्याला पळवलं गेलं, असा खळबळजनक दावा माफिया ललित पाटील याने केला. यानंतर राज्यातलं राजकारण तापलं आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गिरणा नदी पात्रात कोट्यवधींचं ड्रग्ज सापडलं आहे. मध्य रात्रीपासून नदीपात्रात शोध मोहीम सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ड्रग्ज प्रकरणावरून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'ड्रग्ज प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांचं मत काय? पक्ष फोडायचा, उडता महाराष्ट्र करायचा आणि खोक्यांचा वापर करायचा', असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या सुप्रिया सुळे यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्रात ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई झाली. एनसीबीला महाराष्ट्रात यावं लागलं. तेव्हा ड्रग्जविरोधी कारवाई करणाऱ्या यंत्रणांना विरोध करत होतात', असं भाजप नेत्या चित्रा म्हणाल्या.

Supriya Sule, Devendra Fadnavis
Drugs Mafia : मुंबई पोलिसांना गिरणा नदीत सापडले १५ कोटींच्या ड्रग्जचे घबाड!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.