Shivsena Politics : 'त्या' आमच्या पक्षात येणार होत्या? सामंतांच्या दाव्याला सुषमा अंधारेंनी थेट ठाकरेंसोबतचा 'तो' फोटोच शेअर करत दिलं प्रत्युत्तर

Sushma Andhare vs Uday Samant : 'उदयभाऊ उपमुख्यमंत्रिपदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी उघड केल्याने एका अर्थी तुमचे मनसुबे उधळल्यासारखे झाले आहेत का? माझ्यामुळे आपल्या सुप्त इच्छा जगजाहीर झाल्या आहेत का? कदाचित त्यामुळेच आपण आज वैतागून माझी आणि नरेश मस्के यांची भेट झाल्याचे मुलाखतीत सांगत होतात.'
Uday Samant, Sushma Andhare
Uday Samant, Sushma Andhare Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 23 Nov : ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला होता. सुषमा अंधारेंनी दिल्लीत खासदार नरेश म्हस्के यांची भेट का घेतली होती? हे देखील मला माहिती आहे, असं म्हणत त्यांनी अंधारेंच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण केला होता.

सामंत यांच्या वक्तव्यामुळे अंधारे आणि म्हस्के भेटीचा विषय चांगलाच चर्तेत आला. त्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी सामतांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यासाठी त्यांनी एक्सवर भलं मोठं पत्र लिहिलं आहे. त्यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, आज एका जाहीर कार्यक्रमांमध्ये तुम्ही शिंदेंमुळे दखलपात्र झाला आहात हे मान्य केलं.

पण सगळ्यात आधी तुम्हाला राजकीय क्षेत्रात जे स्थान दिले ते ठाकरेंनी. त्यानंतर आपली एक धुरंधर राजकारणी म्हणून ओळख राष्ट्रवादीने तयार केली. तिथून आपण शिवसेनेत येऊन आपण एक मुत्सद्दी राजकारणी आहात हे सिद्ध केले. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना आपण सत्तेसाठी कुणासोबतही जाऊ शकता हे सिद्ध केले.

उदयभाऊ , आता उपमुख्यमंत्रिपदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी उघड केल्याने एका अर्थी तुमचे मनसुबे उधळल्यासारखे झाले आहेत का? माझ्यामुळे आपल्या सुप्त इच्छा जगजाहीर झाल्या आहेत का? कदाचित त्यामुळेच आपण आज वैतागून माझी आणि नरेश मस्के यांची भेट झाल्याचे मुलाखतीत सांगत होतात. होय माझी आणि नरेश मस्के यांची नक्की भेट झाली. भेट घेतली नाही; भेट झाली.

Uday Samant, Sushma Andhare
Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या, कुटुंबाचा हत्येचा आरोप; मामाने सांगितले धक्कादायक कारण

दिल्ली महाराष्ट्र सदनच्या उपहारगृहामध्ये चहासाठी बसल्यानंतर भेट झाली माझ्या समवेत माझ्या पक्षाचे खा. भाऊसाहेब वाकचौरे असताना बाजूला खा. भगरे गुरुजी असताना आणि समोर अनेक वृत्तवाहिन्यांचे पत्रकार बसलेले असताना माझी भेट झाली. विशेष ही भेट झाल्यावर मी सगळ्यात आधी माझ्या पक्षप्रमुखांना ही माहिती दिली हे कदाचित आपल्याला माहित नसेल. पण तरीही मी समजूच शकते.

उदय भाऊ, आता तिथूनही तुम्ही फुटून निघण्याच्या तयारीत आहात. आणि नेमकं तुमच्या याच दुखऱ्या नसेवर मी बोट ठेवलं तेव्हा तुम्ही कळवळून माझ्याबद्दल अतिशय सहज स्वाभाविक घडलेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. पण उदय भाऊ, आपला वार अगदीच बेकार गेला आहे. पण या निमित्ताने का असेना माझं बोलणं हे तुमच्या फार जिव्हारी लागलंय हे लक्षात आलं, असो.

हा फोटो मी काही सांगण्यापेक्षा जास्त बोलका आहे. तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढं आम्हालाही बोलवा बरं का, असा टोला लगावत अंधारेंनी सामंतांना प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे आता सुषमा अंधारेंच्या पत्राला उदय सामंत काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Uday Samant, Sushma Andhare
Solapur Politics : 'त्यांचा बालहट्ट मी पूर्ण करू शकत नाही, आयुष्यभर टक्केवारी गोळा केली...', जयकुमार गोरेंची शिंदेंवर सडकून टीका

उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

एका मुलाखतीत बोलताना उदय सामंत म्हणाले, सुषमाताई दिल्लीत नरेश म्हस्केंना का भेटल्या? हे मला माहिती आहे. याचं उत्तर म्हस्के चांगलं देऊ शकतात. माझ्याकडे 20-40 आमदार आहेत हे माहिती असेल, तर मग हेदेखील माहिती असेल की खासदार नरेश म्हस्के यांना कशासाठी भेटत असतील.

अंधारे यांनी माझ्यावर टीका केली तरी मी वाटेल त्या थराला जाऊन टीका करणार नाही. ती माझी संस्कृतीही नाही. पण त्या कधी आमच्या पक्षात येणार होत्या? ठाकरेंवर का नाराज होत्या? त्यांना पक्षात बोलायला कोण देत नव्हतं? याचीही उत्तरं दिली पाहिजेत.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com