मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांमध्ये काहीतरी बिनसल्याची जोरदार चर्चा!

Eknath Shinde : शिंदे- फडणवीस नेहमी एकत्र उपस्थित राहत होते.
Eknath Shinde and Devendra Fadanvis
Eknath Shinde and Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात सत्तापालट होऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी सोबत दिसून येत होते. पत्रकार परिषद असो किंवा कोणतेही शासकीय कार्यक्रम ते सतत सोबत राहिले होते. आज राज्यातल्या महत्त्वाचे कार्यक्रम नियोजित होते. मात्र या कार्यक्रमात शिंदे-फडणवीस एकत्र सोबत उपस्थित नसल्याने आता चर्चांना उधाण येत आहे.

आज मुंबई आणि ठाणे येथे दिवसभरात महत्वाच्या कार्यक्रमात शिंदे - फडणवीस एकत्र दिसले नाहीत. मुंबई - ठाणे या ठिकाणी तीन कार्यक्रम नियोजित होते. महाराष्ट्र स्टार्टअप वीक आणि महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा पुरस्कार वितरणाचे राजभवन येथे आयोजन करण्यात आले होते. यानंतर श्रीमद् भागवत कथा कार्यक्रम वाय. के. हॉस्टेलसमोर, आनंदनगर, ठाणे येथे होते. तर ऑल इंडिया बंजारा सेवा संघातर्फे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा भव्य सत्कार समारंभाचा ठाणे पश्चिम येथे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी शिंदे फडणवीस एकत्र आले नाहीत.

Eknath Shinde and Devendra Fadanvis
'रूपयाची घसरण नाही, तर डॉलर मजबूत होतोय..' अर्थमंत्र्यांचा युक्तिवाद!

दिवभरातल्या महत्त्वाच्या नियोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही अंतराने मागे - पुढे आले. मात्र या तीन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र मंचावर आले नाहीत. यामुळे आता त्यांच्यात काहीतरी बिनसलंय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Eknath Shinde and Devendra Fadanvis
राज ठाकरेंच्या भेटीचे कारण खुद्द मुख्यमंत्री शिंदेंनीच सांगितले...

पत्रकार परिषद असो किंवा कोणतेही कार्यक्रम असो, शिंदे- फडणवीस नेहमी एकत्र उपस्थित राहत होते. आजच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना शिंदे - फडणवीस एकत्र आले नाहीत, यामुळे त्यांच्यात काही बिनसलंय का? शिंदे गट आणि भाजप यांच्यात कसला सुप्त संघर्ष सुरू आहे का? ते एकमेकांवर नाराज आहेत का ? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com