IAS Transfers News : 'पीएमपीएमएल'चे एमडी बकोरियांची दहा महिन्यांतच उचलबांगडी; पीएमपी कशी स्थिरावणार?

Omprakash Bakoria News : राज्य सरकारने चार वरिष्ट IAS अधिकाऱ्यांची बदली केली आहे.
Sachindra Pratap Singh, Omprakash Bakoria News
Sachindra Pratap Singh, Omprakash Bakoria NewsSarkarnama
Published on
Updated on

IAS Transfers Pune News : राज्य सरकारने चार वरिष्ट IAS अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यामध्ये 'पीएमपीएमएल'चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांची दहा महिन्यांतच उचलबांगडी केली आहे. त्यांची ‌मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे.

सचिंद्र प्रताप सिंग यांची 'पीएमपीएमएल'चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओम प्रकाश बकोरिया यांची समाज कल्याण आयुक्त, पुणे (Pune) येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

Sachindra Pratap Singh, Omprakash Bakoria News
Ajit Pawar News : अजित पवारांच्या एन्ट्रीने शिंदे गटासोबत भाजपच्या आमदारांमध्येही नाराजी?

तर समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नरनावरे यांची महिला व बालकल्याण आयुक्त पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महिला व बाल बालकल्याण आयुक्त विमला आर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई (Mumbai) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

बकोरिया यांनी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यभार सांभळला होता. पुणे महापालिकेनंतर बकोरिया यांची बदली क्रीडा आयुक्त म्हणून करण्यात आली होती. महापालिकेत कार्यरत असताना वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने उपाययोजना केल्या होत्या.

Sachindra Pratap Singh, Omprakash Bakoria News
Ahmednagar NCP News : नगर जिल्ह्यात शरद पवारांच्या पाठीशी चार तर अजितदादांच्या पाठीशी केवळ दोन आमदार !

आळंदी रस्ता आणि नगर रस्ता बीआरटी मार्गाचे कामही त्यांच्या कार्यकाळात झाले होते. या दोन्ही मार्गांचे लेखापरीक्षणही त्यांनी करून घेतले होते. त्यांच्याकडे 'पीएमपीएमएल' (PMPML) कार्यभार आल्यामुळे 'पीएमपीएमएलच्या कामकाजात सुधारणा होतील असे सांगितले जात होते. मात्र, त्यांची दहा महिन्यांतच उचलबांगडी केली. त्यामुळे पीएमपी कशी स्थिरावणार असा प्रश्नच आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com