Maharashtra Corona : आरोग्य विभाग 'अलर्ट' ; आरोग्यमंत्र्यांनी सांगितला 'हा' फॉर्म्युला

Maharashtra Corona : ‘टेस्ट- ट्रॅक- ट्रीट- व्हॅक्सिनेशन’
Maharashtra Corona :
Maharashtra Corona :sarkarnama
Published on
Updated on

नागपूर : तीन वर्षे लॉकडाऊनमध्ये कोरोना (Corona) रोखण्याच्या धोरणावर चालणाऱ्या चीनचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. लॉकडाऊन उघडताच रुग्णालयांत मृतदेहांचे ढीग लागत आहेत. संसर्गाच्या या स्फोटामागे ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट बीएफ.७ आहे. भारतातही तो आढळत होता.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही. राज्यात टास्क फोर्स (task force) स्थापन करण्याची घोषणा काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात केली. तर राज्यात ‘टेस्ट- ट्रॅक- ट्रीट- व्हॅक्सिनेशन’वर भर दिला जाईल, असे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी काल नागपूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

तानाजी सावंत म्हणाले, "कोरोनाचे निर्बंध अद्याप कोठेही लावण्यात येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील आवश्यक ते निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेतला आहे. आरोग्य यंत्रणेस अलर्ट मोडवर राहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात मोठ्याप्रमाणावर लसीकरण झाले आहे. नविन व्हेरिएंट हा तेवढा घातक नाही,"

कोरोनाच्या नविन व्हेरिएंटचा राज्यात अद्यापही एकही रूग्ण सापडलेला नाही. प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्हणून विमानतळावर तपासणी आणि तपासणीत काही आढळून आल्यास तात्काळ विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सावंत यांनी सांगितले.

Maharashtra Corona :
Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणाले, 'त्या' अधिकाऱ्याचा कार्यक्रम करणार ; लगेच तलवार काढायला लावता..!

राज्याचे प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव नविन सोना, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डाँ.साधना तायडे यांच्यासह राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य आधिकारी, यांच्याशी दूरदृश्‍य प्रणाली द्वारे सावंत यांनी संवाद साधला.

प्रतिबंधात्‍मक उपाय म्हणून विमानतळ, राज्याच्या सीमारेषा, या भागातून येणारया व्यक्तींची थर्मल टेस्टींग तसेच इतर अत्यावश्यक चाचणी करून घेण्यात येणार आहेत, याबरोबरच त्या चाचणीत काही आढळून आले तर लगेचच विलगीकरण करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com