Mumbai Politics : मुंबईत लढाई शिवसेनेची; पण मतदारांना आवाहन बिहारीबाबूचं..!

Shivsena Uddhav Thackeray Politics : राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुंबई, ठाण्यातील उत्तर भारतीय मतदारांना महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांसाठी आवाहन केले आहे.
Tejaswi Yadav
Tejaswi YadavSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात 13 जागांवर मतदान होत आहे. यातील बहुतांशी लढती मुंबई आणि मुंबईजवळ आहेत. या सर्व लढती लक्षवेधी असून, यात ठाण्यातील लढत अटीतटीची आहे. या मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांचा प्रभाव आहे. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही शिवसेनांमध्ये चढाओढ दिसते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांसाठी महाविकास आघाडी इंडियातील राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुंबई, ठाण्यातील उत्तर भारतीय मतदारांना आवाहन केले आहे. तेजस्वी यादव Tejaswi Yadav यांच्या आवाहनानंतर उत्तर भारतीय मतदारांचा मतदानातील टक्का किती महत्त्वाचा? याची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे.

राज्याच्या राजकारण गेल्या अडीच वर्षात अनेक स्थित्यंतरे झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. या पक्षफुटीनंतर दोन्हीकडचे नेते पहिल्यादांच निवडणुकीला समोरे जात आहे. आता पाचव्या टप्प्यात राज्यात 13 जागांवर मतदान होत आहे. या सर्व लढती मुंबई Mumbai आणि मुंबईचा प्रभाव असलेल्या ठिकाणी होत आहे. मुंबईत मराठी माणसांबरोबर उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांचा प्रभाव अधिक दिसतो.

या मतदारांना शिवसेना ठाकरे पक्षाकडून आवाहन केले जाऊ लागले आहे. मुंबई आणि मुंबईच्या आजुबाजुच्या परिसरात शिवसेनेचा पहिल्यापासून प्रभाव दिसतो. शिवेसना फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपआपली शिवसेना घेऊन निवडणुकीला पहिल्यादांच समोरे जात आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे यांनी या लढती प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.

Tejaswi Yadav
Thane Politics : शिंदेंच्या ठाण्यात नरेश म्हस्केंचा रातोरात 'गेम'; मोदींच्या रॅलीत श्रीकांत शिंदे, कपिल पाटलांना मानाचं पान

ठाणे लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तिथे शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray पक्षाचे उमेदवार खासदार राजन विचारे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यात सरळ लढत होत आहे. राजन विचारे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असल्याने त्यांच्या मदतीला उत्तर भारतीय नेते देखील उतरलेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजश्वी यादव यांनी ठाण्यातील बिहारी आणि पूर्वांचल नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडी इंडियाबरोबर राहण्याचे आवाहन केले आहे. तेजस्वी यादव यांच्या आवाहनाचा व्हिडिओ राजन विचारे यांनी त्यांच्या समाज माध्यमांवर ट्विट केला आहे.

Tejaswi Yadav
Pune Police News : चोरांची भलतीच डेअरिंग; पोलिसांनाच दणका; सीपी ऑफिसही नाही सुरक्षित

शिवसेनेचा उत्तर भारतीयांशी संघर्ष

शिवसेनेचा जन्म मुंबईतील मराठी माणसांच्या हक्कासाठी झाला. यातून शिवसेनेचा उत्तर भारतीयांशी झालेला संघर्ष सर्वश्रुत आहे. उत्तर भारतीयांशी संघर्ष करताना शिवसेनेशी हिंसक आंदोलन झाली होती. तसा इतिहास आहे. हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे हिंदुत्वाचा मुद्दा पेटवला. बाळासाहेबांच्यानंतर शिवसेनेचे सूत्र उद्धव ठाकरेंकडे आली. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा मुद्दा उद्धव ठाकरेंनी अधिक स्पष्ट करत त्यात सर्वांना समावून घेतले. असे असले, तरी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मराठी माणूस सर्वोच्च ठेवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता पुलाखालून बरेच पाणी गेले. शिवसेना Shivsena फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व अधिक व्यापक केले. भाजपच्या जातीभेद करणारे हिंदुत्व मान्य नाही. भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी झाले आहेत. शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपआपली शिवसेना घेऊन लोकसभेच्या निवडणुकांना समोरे जात आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष आणि त्यांच्या पक्षप्रमुखांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे प्रत्येक मतदानाचा हिशोब केला जात आहे. यातून महाविकास आघाडी इंडियातील प्रत्येक नेता देशातील कानाकोपऱ्यात असलेल्या आपआपल्या समूहाच्या मतदारांना मतदानाचे आवाहन करताना दिसतो आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Tejaswi Yadav
Sunil Tatkare News : नाशिकची जागा गमावल्याचं अजित पवार गटाला अद्यापही दुःख; सुनील तटकरे म्हणतात..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com