'' संजय राऊतांनी आधी त्यांचे चालक पालक उध्दव ठाकरेंनी कोणत्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला, ते सांगावं!''

Atul Bhatkhalkar on Sanjay Raut : संजय राऊतांनी फालतू आणि वायफळ बोलणं बंद करावं, अन्यथा...
Atul Bhatkhalkar, Sanjay Raut
Atul Bhatkhalkar, Sanjay RautSarkarnama

Atul Bhatkhalkar on Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत असं विधान केलं होत. त्यांच्या विधानावर विरोधकांनी सडकून टीका केली होती. तसेच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून देखील फडणवीसांवर निशाणा साधताना नवीन राष्ट्रपिता मोदी यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता? असा सवाल उपस्थित केला होता. या टीकेला आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Atul Bhatkhalkar, Sanjay Raut
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! गुवाहाटीनंतर शिंदे गट आता अयोध्येला जाणार

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सामनातील टीकेवर भाष्य करताना ठाकरेंवर ह्ल्लाबोल केला आहे.

अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणाले, संजय राऊतांनी आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांनी कोणत्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता, हे आधी सांगावं. तसेच त्यांचे चालक पालक, ज्यांच्याकडे ते नोकरी करतात, त्या उद्धव ठाकरेंनी सुध्दा कोणत्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता हे सांगावं. आणि त्यानंतर मग आमच्यावर टीका करावी.

Atul Bhatkhalkar, Sanjay Raut
Sai Resort : अनिल परबांचे पाय आणखी खोलात ? ; दोन महिन्यात चौथा गुन्हा दाखल

यावेळी भातखळकर यांनी संजय राऊतांनी फालतू आणि वायफळ बोलणं बंद करावं, अन्यथा पूर्वीचे दिवस येतील हे त्यांनी लक्षात ठेवावं असा इशाराही दिला आहे.

...पण अमृता फडणवीसांच्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय?

संजय राऊत यांनी अमृता फडणवीसांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, अमृता फडणवीस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे व त्यांची मते त्या मांडत असतात. आता त्यांनी एक मत मांडले, आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत! सौ. फडणवीस यांचे स्वतंत्र विचार असू शकतात व एक नागरिक म्हणून त्यांना आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.पण त्यांनी मांडलेल्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय ? असा प्रश्न अग्रलेखात विचारला आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com