TET Exam Cancelled : TET चा पेपर फुटला! उद्या होणारी परीक्षा रद्द; 24 तास आधीच लाखो परीक्षार्थ्यांना धक्का

TET Exam Cancelled: देशात NEET परीक्षेनंतर पुन्हा एकदा महत्वाच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानं लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
TET  exam
TET examsarkarnama
Published on
Updated on

TET Exam Cancelled : शिक्षकांसाठीची पात्रता परीक्षा असलेली टीईटीची उद्या होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटला आहे. त्यामुळं ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त, प्रिया शिंदे पाटील यांनी या पेपरफुटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसंच परिषदेकडून यासंदर्भात अधिकृत निवेदनाचं पत्रही प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

देशात NEET परीक्षेनंतर पुन्हा एकदा महत्वाच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानं लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. टीईटीच्या परीक्षेला यंदा 6 लाख परीक्षार्थी बसले होते. यात पुण्यातून सर्वाधिक 45 हजार 562 परीक्षार्थी आहेत. राज्यातील 1,728 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती.

भिवंडीतून पेपर फुटला

उद्या रविवार, २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर हा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथून फुटला असून तो नेमका कोणत्या यंत्रणेद्वारे फुटला हे अद्याप कळू शकलेलं नाही. भिवंडी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देखील मिळते आहे. त्याचबरोबर हे पेपर त्यांच्याकडं कुठून आले? कुठल्या यंत्रणेमार्फत हा पेपर समोर आला आहे? याची प्राथमिक चौकशी सध्या पोलीस करत आहेत.

TET  exam
TET Exam 2026: दादा भुसे यांच्या हस्तक्षेपानंतर TET नियमात बदल; हिजाब वादावर पडदा, धार्मिक स्वातंत्र्याचा सन्मान करणारा निर्णय

पेपरची होत होती विक्री

पोलिसांना आपल्या खबऱ्यांकडून या पेपरफुटीची माहिती मिळाली होती की, टीईटीच्या परीक्षेचा पेपरची सध्या विक्री सुरु आहे. अनेकांकडून या पेपरसाठी पैसे दिले जात आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हा फुटलेला पेपरही मिळवला आहे. त्यानुसार, पुढे शिक्षण विभागाकडून ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

TET  exam
NEET Exam: पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांचा संताप अन् CJP आंदोलन! सरकार चांगलंच धास्तावलं; NEETच्या नियमांमध्ये केले महत्वाचे बदल

पेपर तपासणीत झाला होता घोटाळा

यापूर्वी देखील ही परीक्षा झाली होती तेव्हा त्याच्या तपासणीमध्ये मोठा घोटाळा झाला होता. अनेकांना अवाजवी पद्धतीनं कितीही मार्क्स वाढवून देण्यात आले होते. त्यामुळं या परीक्षेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलेला असतानाच आता बऱ्याच काळानंतर होत असलेल्या याच परीक्षेचा पेपर फुटल्यानं शिक्षकांमध्ये आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसंच आता टीईटीची अटच रद्द करण्याची मागणी वाढू लागली आहे.

टीईटीची अट रद्द करा - खांडेकर

NEET पेपर फुटीनंतर महाराष्ट्रात TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटला. त्यामुळं महाराष्ट्राच्या वैभवशाली शैक्षणिक वाटचालीला गालबोट लागलं आहे. सर्वोच न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळं व शासनाने घेतलेल्या बोटचेपी धोरणामुळं सेवेत असलेल्या शिक्षकांना सुद्धा TET परीक्षा द्यावी लागत आहे. राज्यातील 6 लाख 125 विद्यार्थ्यांनी TET परीक्षेची तयारी केली. मात्र, परीक्षा रद्द झाल्यानं शिक्षक व इतर उमेदवारांमध्ये संतापाची लाट आहे. मागीलवर्षी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यात पेपर फुटीची घटना घडल्याची चर्चा झाली होती. मात्र, ही घटना दडपण्यात आली. राज्यात अनेक कर्मचारी भरतीच्या संदर्भानं घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पेपर फोडल जातात. ज्या परीक्षेवर लाखो विद्यार्थ्यांचे, उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे, अशा परीक्षा नीटपणे आणि पारदर्शकपणे घेणे गरजेचं आहे. परीक्षाच योग्य पद्धतीनं घेता येत नसेल तर TET परीक्षा सक्तीची अट रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस शिवाजी खांडेकर यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com