Ayodhya Paul Inc Attack: अयोध्या पौळ शाईफेक प्रकरणी मोठी कारवाई; पोलिसांकडून दोन महिलांना अटक

Mumbai : ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक आणि मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती.
Ayodhya Paul Inc Attack
Ayodhya Paul Inc AttackSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक आणि मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. आता या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी दोन महिलांना अटक केलं आहे. अयोध्या पौळ यांच्यावरील शाईफेक आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कळवा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अयोध्या पौळ या शिवसेना ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक आहेत. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कळवा येथे एका कार्यक्रमादरम्यान अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक करत त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर अयोध्या पौळ यांनी या घटनेप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Ayodhya Paul Inc Attack
Ayodhya Paul Ink Attack : मोठी बातमी! ठाकरे गटाच्या 'फायरब्रँड' नेत्या अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक

दरम्यान, शाईफेक आणि मारहाण झाल्यानंतर हा माझ्यासाठी ट्रॅप लावण्यात आला होता, येथे बोलावून मला मारहाण करण्यात आल्याचा आरोप अयोध्या पौळ यांनी केला. त्यानंतर आता या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Ayodhya Paul Inc Attack
Ayodhya Paul Inc Attack : ''अयोध्या पौळ यांच्यावर खरंच शाई फेक झाली का?''

अयोध्या पौळ या वेळोवेळी ठाकरे गटाची बाजू जोरदारपणे मांडतात. ठाकरे गटावर होणाऱ्या आरोपांवर पौळ त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर देतात. भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना पौळ विविध मुद्द्यावरून अनेक प्रश्न विचारत पोलखोल करतात.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com