Sushma Andhare : 'म्हस्केंना उमेदवारी म्हणजे महायुतीने..' ; सुषमा अंधारेंची बोचरी टीका!

Sushma Andhare Vs CM Eknath shinde : 'मुख्यमंत्र्यांना आपल्या स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करता येत नाही, यातच...'असा टोलाही लगावला आहे.
Sushma Andhare Vs Naresh Mhaske
Sushma Andhare Vs Naresh MhaskeSarkarnama

Loksabha Election 2024 : सध्या राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. मतदानचे तीन टप्पे पार पडले असून, चौथ्या टप्प्यमधील मतदान 13 मे रोजी होणार आहे. तर आगामी टप्प्यात ज्या मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे, त्या ठिकाणाच्या उमेदवारांसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीचे नेते मंडळी प्रचारसभांमधून जोर लावत आहेत. यावेळी विरोधी पक्षावर आरोप, टीका, टिप्पणी तर कधी टोला लगावला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यावर निशाणा साधला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

Sushma Andhare Vs Naresh Mhaske
Eknath Shinde News : भुमरेमामांच्या विजयाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली, संभाजीनगरात तळ ठोकला...

'शिंदे गटाचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांना उमेदवारी म्हणजे महायुतीने सगळी मस्करी केल्यासारखेच आहे.', अशी बोचरी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच 'मुख्यमंत्र्यांना आपल्या स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करता येत नाही, यातच सगळी नाचक्की आहे.' असंही त्यांनी यावेळी म्हटले.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे आणि ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे(Rajan Vichare) यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कोपरी येथील जाहीरसभेत सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेवर टीका केली. एवढंच नाही तर अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गावठी चाणक्य असंही संबोधलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 30 ते 35 प्लस जागा येतील, असा विश्वासही व्यक्त केला.

Sushma Andhare Vs Naresh Mhaske
Vinayak Raut News : 'आम्ही खोक्याचे भुकेलो नाही,तर...'; ठाण्यात विनायक राऊतांनी शिंदेंना डिवचलं

'ज्या बाळासाहेबांनी छोट्यातल्या छोट्या माणसाला मोठा नेता केला. ज्या ठाण्यावर बाळासाहेबांनी मनापासून प्रेम केलं. ज्या ठाण्याला बाळासाहेबांनी आपलं मानलं. त्याच ठाणेकरांच्या माथी गद्दारीचा शाप बसला आहे, तो लवकरच मिटवायचा असल्याचे, यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार(Sharad Pawar) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

सर्वपक्षीय नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना माझं एकच सांगण आहे, तुम्हाला नरेश म्हस्केंनी दिलेला त्रास विसरू नका. कोपरीसह ठाण्यातील अनेक नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांचे हाल नरेश म्हस्केंनी केले आहेत. भाजपच्या(BJP) नगरसेवकांनाही माझं सांगणं आहे की आज ते तुमच्याकडे येत आहेत आणि खांद्यावर हात टाकतील. पण तुम्हाला सगळ्यांना दिलेला त्रास विसरू नका, असे जबदरस्त टीका काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com