Thane News : आम्ही खोक्यांचे भुकेलेलो नाहीत तर आम्ही आशीर्वादाचे भुकेलेलो आहोत. आम्हाला आशीर्वाद पाहिजे मतदारांचे.. आम्हाला आशीर्वाद पाहिजे ‘मातोश्री’चे. लोकप्रतिनिधी पद जे आम्हाला मातोश्रीने प्राप्त करून दिलेले आहे. हे गद्दारांना काय कळणार. त्यामुळे आम्ही मातोश्रीशी एकनिष्ठ राहिलो आहोत, असा टोला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी ठाण्याच्या सभेत शिंदे गटाला लगावला.
महाविकास आघाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ कोपरी येथे शुक्रवारी महासभा एकनिष्ठेची या सभेचे आयोजन केले होते. यावेळी राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. तसेच विचारे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले, यांनी शिवसेना फोडणार्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का मारला जाणार असून पुढची पिढीदेखील त्यांना माफ करणार नसल्याचे टीका त्यांनी केली. तसेच ही निवडणूक भारत मातेची आहे. ही निवडणूक संविधानाची आहे. ही निवडणूक घटनेची आहे. ही निवडणूक स्वातंत्र्याची असल्याचे राऊत यांनी सांगितले. दिल्लीमध्ये बसलेल्या हुकूमशाहीची राजवट मी आणि राजन विचारे संसदेत बसून पाहात आहोत. कशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून देश लुटत आहेत.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार जितेंद्र आव्हाड,सुषमा अंधारे ,प्रियंका जोशी, विक्रांत चव्हाण, सुहास देसाई, केदार दिघे यांसह महाविकास आघाडीचे अनेक नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते हे उपस्थित होते.
(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारेंचा आम्हाला अभिमान आहे. एक सच्चा कार्यकर्ता, निस्वार्थ सेवा करणारा एक लोकप्रतिनिधी. एक निष्ठावंत कसा असला पाहिजे हे राजन विचारेंकडून (Rajan Vichare) शिकावं. ज्यांच्या हृदयात गद्दारी बिनलेली आहे, बेईमानी आहे, खाल्ल्या ताटामध्ये घाण करणार्यांकडून निष्ठेची अपेक्षा नाही, असेही विनायक राऊत यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.