Uddhav Thackeray: विमानात बिघाड, उद्धव ठाकरेंचा नांदेड दौरा रद्द ; मराठा आंदोलकांनी बैठक उधळली...

Maratha Reservation: ठाकरे सेनेचे नेते, पदाधिकारी नांदेड विमानतळावर सकाळी अकरा वाजता उपस्थित होते.
Sarkarnama
SarkarnamaSarkarnama
Published on
Updated on

Nanded News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नांदेड दौरा रद्द झाला आहे. माजी आमदार, नांदेडचे जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला ठाकरे उपस्थित राहणार होते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ठाकरेंच्या दौरा रद्द झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सोबत खासदार संजय राऊत, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार होते. या नेत्यांच्या स्वागतासाठी ठाकरे सेनेचे नेते, पदाधिकारी नांदेड विमानतळावर सकाळी अकरा वाजता उपस्थित होते. पण ठाकरेंचा दौरा रद्द झाल्याने ते माघारी फिरले.

ठाकरे हे अन्य नेत्यांसोबत खासगी विमानाने सकाळी 11 वाजता नांदेड विमानतळ येथे येणार होते. त्यानंतर, वाहनाने हदगाव येथील माजी आमदार नागेश आष्टीकर यांच्या मुलींच्या विवाह सोहळ्यास हजेरी लावणार होते. त्यांच्या दौऱ्यानिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ही बैठक उधळून लावली.मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांना शासकीय विश्रामगृहात बैठक, कार्यक्रम घेऊ देणार नाही, असा निर्धार करत आंदोलकांनी ही सभा उधळून लावली.

Sarkarnama
Sharad Pawar: मी अजूनही तरुणच...लवकरच नवा इतिहास घडविणार! पवारांचा निर्धार...

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरात पाठींबा मिळत आहे. नेत्यांना गावबंदीचा निर्णय काही दिवसांसाठी शिथिल केला आहे. पण राजकीय कार्यक्रमांवरचा बहिष्कार कायमच आहे.

उद्धव ठाकरे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. त्यामुळे शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी दुपारी उबाठा गटाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक सुरू असताना मराठा आंदोलन कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा देत शिवसेनेची बैठक उधळून लावली. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बैठकीतून काढता पाय घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com